Headlines

कपाळाला गंध लावून काशी मध्ये संन्याश्यासारखी फिरत आहे रविना टंडन, फोटो आणि व्हिडीओ व्हायरल !

अभिनेत्री रवीना तंडन हिने एकेकाळी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याकाळी तिचा चाहतावर्ग खूप मोठा होता. अजूनही तिच्या चाहत्यावर्गात काहीच घट झालेली नाही. सध्या अभिनेत्री चित्रपटामध्ये खूप कमी सक्रिय असते. पण ती वेगवेगळ्या कार्यक्रमांना, इव्हेंट्सना आवर्जून उपस्थिती लावते. अभिनेत्री सर्वात शेवटी केजीएफ2 मध्ये दिसली होती.
रवीना चित्रपटांमध्ये फारशी सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

तिथे आपले फोटो आणि व्हिडिओ टाकून चाहत्यांना खिळवून ठेवते. आता पुन्हा एकदा अभिनेत्री सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. सध्या ती धार्मिक स्थळांचे दर्शन घेत आहे. रवीनाचे तिथले काही फोटो समोर आले आहेत. त्यात ती गंगातिरी सेल्फी घेत आहे. आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतरच्या पहिल्या जंयती निमित्त अभिनेत्री काशीला गेली होती. तिथे तिने वडीलांना श्रद्धांजली दिली तसेच गंगानदीच दीपदान देखील केले. तसेच तिने तिथल्या सूर्योदयाचा आस्वाद घेतला. आपले सुंदर फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

फोटोमध्ये ती गंगाभ्रमंती करताना दिसली. त्यानंतर ती संकट मोचन मंदिरात दर्शनासाठी गेली. त्यानंतर संध्याकाळी तिने दशाश्वमेध घाटात होणाऱ्या महाआरतीतही सहभाग घेतला. पुढे सकाळी 5 वाजता ती नाव्हेतून अस्सी घाटला गेली व तिथे गंगा आऱती करुन सूर्योदयाचे दर्शन घेतले. हे फोटो शेअर करुन अभिनेत्रीने याहून अधिक दिव्य आणि सुंदर काहीच नाही असे कॅप्शन दिले आहे.

रवीनाने घाटांमध्ये आणि जुन्या भवनांमध्ये खूपसारे फोटो काढले आहेत. ते फोटो शेअर करताना तिने, मै बंजारन असे कॅप्शन दिले.

कोणालाही पूर्वकल्पना न देता रवीना अचानक वाराणसीला गेली. तिथे तिने घाटांची सफर केली. बोटीतून प्रवास केला. आपल्या या अध्यात्मिक प्रवासाबद्दल रवीनाने लिहिले, काशी…अखेर मी इथे त्या शांततेचा अनुभव घेतलाच, जो मी कायम माझ्या मनात साठवून ठेवीन. जन्मदिन आणि शिवरात्री, तुमचे स्मरण करण्यासाठी याहून चांगली जागा नाही. रवीना आपल्या वडिलांच्या जयंतीनिमित्त काशीला गेली होती.