काही दिवसांपूर्वीच साऊथकडील सुप्रसिद्ध नागा आणि सामंथाचा घ’ट’स्फो’ट झाला. त्यांच्या अशा वेगळे होण्यामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला पण त्या दोघांना मात्र त्याचे काहीच पडलेले नाही असेच वाटते कारण सामंथा सध्या तिच्या करीअरमध्ये व्यस्त आहे तर नागाच्या आयुष्यात तो पुन्हा एकदा प्रेमात पडला आहे.
घ’ट’स्फो’टा’नंतर अवघ्या काही महिन्यातच त्याला त्याचे प्रेम मिळाले. नागाची नवी क्रश म्हणजे शोभिता धुलिपाला. शोभिताने अनेक चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये काम केले आहे. ती सोशल मीडियावरसुद्धा खूप अॅक्टिव्ह असते.
मिळालेल्या माहितीनुसार शोभिता नागा चैतन्यपेक्षा ५ वर्षांनी लहान आहे. सध्या तो शोभिताला डेट करत असल्याचे म्हटले जाते. काही दिवसांपूर्वीच त्याला शोभितासोबत त्यांच्या नव्या घरी पाहिले गेले. त्यावरुनच हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे म्हटले जाते.
नागाने हैदराबादमधील जुबली हिल्स येथे नवे घर खरेदी केले. सध्या त्या घराचे काम चालू आहे. नागा चैतन्य शोभिताला त्याचे अलिशान घर दाखवताना त्यांना पाहिले गेले होते. त्यानंतर दोघे एकत्र गाडीत बसून निघून गेले. या घटनेनंतर त्यांच्यात प्रेमाचे वारे वाहत असल्याचे बोलले जाते.
शोभिताने २०१३ ला फेमिना मिस इंडिया स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला होता. रमन राघव 2.0 या चित्रपटातून तिने अभिनयातील करियरला सुरुवात केली. त्यानंतर तिने शेफ, कालाकांडी, गुडचारी, मूथोन,द बॉडी, घोस्ट स्टोरी यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !