Headlines

सुशांत सिंग राजपूत नंतर रिया चक्रवर्ती पडली या पैसेवाल्या व्यक्तीच्या प्रेमात, वाचून तुम्हालाही धक्का बसेल !

गेल्या दोन वर्षात वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीचे आयुष्य आता स्थिरस्थावर होत आहे. तिच्या आयुष्यात एका खास व्यक्तीचे आगमन झाले आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत्या आत्महत्या प्रकरणात प्रमुख आरोपी म्हणून अभिनेत्री रिया चक्रवर्तीला जेलमध्ये जावे लागले होते. दोन महिने जेममध्ये राहिल्यानंतर ती जामीनावर बाहेर आली. आणि तिने आपले आयुष्य नव्याने सुरु केले.

मिळालेल्या माहितीनुसार रिया रिअॅलिटी शोचा स्पर्धक बंटी सचदेहला डेट करत आहे. बंटी हा फॅशन डिझायनर सीमा सजदेहचा भाऊ आहे. तो स्पोर्ट्स आणि एंटरटेममेंट इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे. तो बडी टॅलेंट मॅनेजमेंटचा मालक आहे. रियाने या इव्हेंट मॅनेजमेंटसोबत याआधी काम केले आहे.

बंटी आणि रिया एकमेकांना खूप आधीपासून ओळखतात. मात्र त्यांच्या डेटींगला नुकतीच सुरुवात झाली. मिळालेल्या माहितीनुसार दोघांनी या वर्षाच्या सुरुवातीलाच एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती.

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर रियाला वेगवेगळ्या तपास यंत्रणेला सामोरे जावे लागले होते. ती सर्वात शेवटी चेहरे या चित्रपटात 2021 मध्ये दिसली होती. रियाला आणि बंटीला एका वाढदिवसाच्या पार्टीला एकत्र पाहिले गेले.

मिळालेल्या माहितीनुसार ते दोघे एकमेकांना डेट करत आहेत. पण त्यांना आपले नाते इतक्यात जगासमोर आणयचे नाही.
बंटीने याआधी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला डेट केल्याचे म्हटले जाते. मात्र त्या नात्याबद्दल सोनाक्षी किंवा त्याने कधीच स्पष्टीकरण दिले नाही.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !