Headlines

भूमी पेडणेकरला बोल्ड ड्रेस घालणं पडलं महागात, लोक म्हणाले उर्फीला मागे टाकतेस का ?

बॉलिवूड सेलेब्स अनेकदा आपल्या लुक किंवा स्टाइलमुळे ट्रोल होतात. तर काहीवेळेस ते त्यांच्या बेताल वक्तव्यामुळे ट्रोल होतो. अलीकडेच अभिनेत्री भूमी पेडणेकर ट्रोलिंगची शिकार झाली आहे. भूमी सध्या आपल्या आगामी ‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

याशिवाय अभिनेत्री आपल्या फॅशन सेन्स आणि ग्लॅमरस लूकमुळेही अनेकदा चर्चेत असते. अभिनेत्री अनेकदा आपले सुंदर फोटो शेअर करत असते, मात्र यावेळी भूमीने साडी आणि ब्रालेटमधील फोटो शेअर केल्याने ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. काही दिवसांपूर्वीच ती एका पार्टीला पांढऱ्या रंगाचा ड्रेस घालून गेली होती. त्यात ती खूपच सुंदर दिसत होती.

चाहत्यांना कलाकारांची प्रत्येक स्टाइल आवडेलच असे नाही. काही वेळा चाहत्यांना त्यांच्या आवडत्या स्टार्सचा ड्रेसिंग सेन्स अजिबात आवडत नाही. असेच काहीसे भूमि पेडणेकरसोबत घडले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)


मध्यंतरी झालेल्या एका पार्टीतील आपल्या लूकचे फोटो तिने आपल्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केले आहेत. पण चाहत्यांना तिची फॅशन बिलकूल आवडली नाही. चाहते तिची उर्फी जावेदशी तुलना करत आहेत. भूमीने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये ‘टॉयलेट: एक प्रेम कथा’, ‘दम लगा के हईशा’, ‘शुभ मंगल ‍‍यादा सावधान’ असे अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत. लवकरच ती राजकुमार रावसोबत ‘भिड’ चित्रपटात दिसणार आहे.

युजर्सच्या निशाण्यावर भूमि पेडणेकर – भूमीला पांढऱ्या कपड्यांमध्ये पाहिल्यावर युजर्स म्हणाले ही जराही चांगली दिसत नाही. हिने अशा कपड्यांची प्रेरणा नक्कीच उर्फी जावेदकडून घेतली असणार असे म्हणत काहींनी तिला ट्रोल केले.
भूमीच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास लवकरच ती ‘गोविंदा नाम मेरा’, ‘भिड’, ‘भक्त’, ‘द लेडी किलर’ आणि ‘अफवाह’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !