Headlines

या फोटो मध्ये असलेली मुलगी करतेय बॉलिवूडवर राज, हॉट चित्रपटासोबत केलेत गाजलेले चित्रपट, ओळखा पाहू तिला !

चित्रपट कलाकारांबद्दल जाणून घेण्यास त्यांचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न त्यांचे चाहते अनेकदा करतात. सध्या कलाकारांच्या बालपणीचे फोटो खूप व्हायरल होत आहेत.

नुकताच एका सेलिब्रेटीचा बालपणीचा फोटो समोर आला आहे. तो फोटो पाहताचक्षणी अनेकांना तो कोणाचा आहे समजले नाही. त्यामुळे सगळेजण आपापल्या मित्रमैत्रीणींना तो फोटो पाठवून त्यातील सेलिब्रेटी कोण हे ओळखण्याचे चॅलेंज देत आहेत. फोटोत बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्री आहे.

व्हायरल फोटोत मुलींचा एक ग्रुप दिसत आहे. त्या फोटोत शेवटच्या रांगेत मध्येच एक मुलगी उभी आहे. ती मुलगी सर्वसाधारण मुलगी नसून एक बॉलिवूडची सुपरस्टार आहे. त्या मुलीने बॉलिवू़डमध्ये अनेकसुपरहिट चित्रपट दिले आहेत. जर तुम्ही ही ती अभिनेत्री कोण हे ओळखू शकला नसला तर आम्ही तुम्हाला मदत करतो.

फोटोत दिसणारी मुलगी बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी आहे. शिल्पा चित्रपटांव्यतिरिक्त आपल्या फिटनेससाठीही ओळखली जाते. शिल्पाने 90 च्या दशकापासून अनेक हिट चित्रपटांमध्ये आपला दमदार अभिनय दाखवला आहे. काही दिवसांपूर्वीच ती ‘निकम्मा’ चित्रपटात दिसली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shilpa Shetty Kundra (@theshilpashetty)


शिल्पाने प्रसिद्ध बिझनेसमन राज कुंद्रासोबत लग्न केले. हिंदीशिवाय तिने साउथकडील चित्रपटांमध्येही काम केले आहे. चित्रपटांसोबतच ही अभिनेत्री छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शोमध्येही दिसते. याशिवाय शिल्पा लवकरच ओटीटीवरही पदार्पण करणार आहे. रोहित शेट्टीच्या इंडियन पोलिस फोर्स या वेबसिरीजमध्ये ती जबरदस्त अॅक्शन करताना दिसेल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !