Headlines

अखेर सत्य आले बाहेर, इंजेक्शन घेऊन मोठी झाली हंसिका मोटवानी ? पहिल्यांदाच सांगितले तिने सत्य !

बॉलीवूड चित्रपट सृष्टीमध्ये हल्ली अभिनेता, अभिनेत्री हे चर्चेचे विषय बनलेले आहेत. काही अभिनेत्री नको त्या परिस्थितीला सामोरे जात आहेत तर काही अभिनेते आपल्या वेगवेगळ्या विधानामुळे प्रसिद्धी पावत आहेत. सगळीकडे या बॉलिवूड सेलिब्रिटींची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे परंतु आज आम्ही तुम्हाला एका आगळ्यावेगळ्या विषयाबद्दल माहिती सांगणार आहोत.

साऊथ पासून ते बॉलीवूड आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजेच हंसिका मोटवानी. ही सध्या चर्चेचा विषय बनलेली आहे. गेल्या काही दिवसापूर्वी आपल्या बॉयफ्रेंड सोबत झालेले लग्न त्यानंतर झालेले हनिमून आणि कधीतरी स्वतःच्या नशा बद्दल वेगवेगळ्या चर्चेत ही अभिनेत्री आपल्याला माध्यमांवर प्रसिद्धी मिळवताना दिसत असते.

सोशल मीडियावर तसेच टीव्ही वर हंसिकाचे इंटरव्यू पाहायला मिळत आहेत. सोशल मीडियावर देखील हंसिका मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झालेली आहे परंतु आज हंसिका चर्चा मध्ये येण्याचे कारण असे की तिच्यावर गेल्या दिवसांपासून एक आरोप लावण्यात आलेला आहे. या आरोपामुळेच आज ती सोशल मीडियावर तसेच माध्यमांचे लक्ष्य बनलेली आहे.

हंसिका वर अनेकदा कथित ग्रोथ हार्मोनचे इंजेक्शन सेवन करून घेऊन मोठे झाल्याचा आरोप लावण्यात आलेला आहे, अशा परिस्थितीमध्येच हंसिका आणि तिची आई मोना मोटवानी यांनी या आरोपावर प्रतिक्रिया देखील दिली आहे.

शाका लाका बूम बूम’ मध्ये छोटीशी गोड, हसत- खेळत राहणारी अभिनेत्री ही या मालिकेतून घराघरांमध्ये पोहोचली. या अभिनेत्रीने अनेकांचे मनोरंजन देखील केले. टेलिव्हिजन क्षेत्रामध्ये चहात्यांचे मनोरंजन केल्यानंतर आपल्याला ही अभिनेत्री चित्रपट “कोई मिल गया” मध्ये ऋतिक रोशन सोबत दिसली.

या चित्रपटात केलेल्या अभिनयामुळे देखील हंसिकाचे अनेक स्तरातून कौतुक करण्यात आले, त्यानंतर हिमेश रेशमिया सोबत “आप का सुरूर” या चित्रपटांमध्ये अचानकपणे ही अभिनेत्री मोठी झाल्याची आपल्याला पाहायला मिळाली आणि हे पाहून सर्वांचे डोकेच फिरले. वर्ष 2007 मध्ये हंसिकाला आपल्याच बदललेल्या रूपामुळे अनेक गोष्टींना सामोरे जावे लागले.

वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा तिच्या बद्दल होऊ लागल्या. अनेकदा टीका देखील झाल्या, अशा वेळी अनेकांनी तिच्या आईवर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप देखील लावले. त्यातील एक आरोप म्हणजे हंसिकाला मोठे बनवण्याच्या नादात तिच्या आईने ग्रोथ हार्मोनचे इंजेक्शन दिले, असे देखील अनेकांनी म्हटले.

आतापर्यंत हंसिका आणि तिची आई हे दोघेही त्यांच्यावर केलेल्या वेगवेगळ्या आरोपावर आतापर्यंत शांत होत्या परंतु काही दिवसापूर्वीच या अभिनेत्रीच्या “लव शादी ड्रामा” कार्यक्रमांमध्ये या दोघांनी या विषयावर दिलखुलास चर्चा देखील केली. या कार्यक्रमांमध्ये हंसिकाने आपल्या आईवर या सर्व आरोपासंबंधित काही प्रश्न देखील विचारले. या कार्यक्रमांमध्ये असे दाखवण्यात आले की, हंसिका आपल्या आईला म्हणते की, लग्नानंतर छापलेल्या एका प्रेस रिलीज ला घेऊन ती कशाप्रकारे त्रस्त झाली होती, त्याचबरोबर या एपिसोड मध्ये हंसिकाच्या आईने आपल्याला मोठे बनवण्याच्या नादामध्ये ग्रुप हार्मोनचे इंजेक्शन दिले यावर देखील भाष्य केले.

हे सारे एक सेलिब्रिटी असल्याचे फळ आहे. जेव्हा मी २१ वर्षाची होती तेव्हा मीडियामध्ये अशीच एक अफवा पसरली होती. तुम्हाला माहिती आहे की मी कोणत्या विषयावर बोलत आहे परंतु जेव्हा 21 व्या वर्षी मी अशा वायफळ गप्पांना व टीकेला सहन करत होती तर या वयात देखील नक्कीच सहन करू शकते, यावेळी लोकांनी असे देखील म्हटले की, माझ्या आईने एक मोठी मुलगी बनवण्यासाठी एक इंजेक्शन तेही हार्मोनल इंजेक्शन दिले आहे परंतु या सगळ्या अफवा आहेत. हे सारे आई मोना मोटवानी सोबत बातचीत करत असताना हंसिका ने म्हटले.

जर हे खरं असेल तर मला टाटा, बिर्ला किंवा एखाद्या करोडपती पेक्षा ही अमीर असायला हवे. जर हे खरं असेल, तर मी म्हटले असते की हे इंजेक्शन मी माझ्या मुलीला दिले आहे तसे तुम्ही देखील या. अन् हे इंजेक्शन घेऊन आपले शरीर सुंदर बनवा. परंतु मला कधी कधी आश्चर्य वाटते की, लोक अशा प्रकारच्या बातम्या कसे लिहितात? जेव्हा बातम्या लिहतात तेव्हा त्यांच्याकडे डोके नावाची वस्तू असते की नाही? मुळात आम्ही पंजाबी लोक आहोत.

आमच्या मुली 12 ते 16 वर्षे यामध्ये त्यांची शारीरिक वाढ होऊ लागते. तुम्हाला सांगू इच्छितो की, या सर्व गोष्टी सांगताना अभिनेत्रीच्या आईच्या चेहऱ्यावर लोकांसाठी स्पष्टपणे राग दिसत होता. या सर्व गोष्टी मोना मोटवानी ज्या शोवर सांगत होत्या, तो हंसिकाचा शो शुक्रवारी लव शादी ड्रामा’ डिस्नी हॉटस्टार वर प्रसारित होतो.