महिन्याला ५० लाख रुपये कमवते ही छोटी मुलगी, समुद्र किनारी आहे स्वतःचा बंगला, जाणून घ्या तिच्याबद्दल !

bollyreport
3 Min Read

अचानक कधी जुन्या फोटोंचा अल्बम मिळाला की तो चाळल्यावर सर्व जुन्या आठवणी जाग्या होतात. आताच्या काळात सर्वांच्याच हातात मोबाईल असल्यामुळे त्यातील कॅमेऱ्यातून कोणताही क्षण सहज कॅप्चर करता येतो. पण पूर्वीच्या काळी तसे नव्हते. फोटो काढण्यासाठी काहीतरी खास क्षण असावा लागायचा. सोशल मीडियावर अनेकदा कलाकार आपले बालपणीचे फोटो टाकून चाहत्यांना हैराण करत असतात.

असाच एक ब्लॅक अँड व्हाइट सध्या व्हायरल होत असून त्यात दिसणारी त्यात दिसणारी मुलगी सहज कोणाला ओळखता येत नाहीय. पण ही मुलगी आज बॉलिवूडमधील एक मोठे नाव आहे. ती आता 48 वर्षांची असून तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. गोविंदा असो की सलमान खान, आजच्या काळात ती सर्वांसोबत सुपरहिट चित्रपट करुन करोडोंची मालकिन बनली आहे. केवळ चांगले उत्पन्नच नाही तर मुंबईत तिचे एक आलिशान घरही आहे.उगीच जास्त ताणत बसण्यापेक्षा ती मुलगी दुसरी कोणीही नसून सर्वांची आवडती अभिनेत्री रवीना टंडन आहे.

व्हायरल फोटो अभिनेत्री रवीना टंडनच्या बालपणीची आहेत. ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांच्या लग्नाच्या फोटोमध्ये दिसत असलेली लहान मुलगी रवीना टंडन आहे. दुसऱ्या फोटोत ती अमिताभ बच्चन यांच्या कुशीत आहे. हे फोटो तिच्या बालपणाचे आहेत, जेव्हा ती बॉलिवूडमध्ये नावारुपाला आली नव्हती. रवीना टंडन ही ९० च्या दशकातील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. विशेष म्हणजे सध्या ती ओटीटी प्लॅटफॉर्मही गाजवत आहे.

रवीना टंडन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अनेकदा ती आपले फोटो शेअर करत असते. ती आपल्या बालपणीचे अनेक फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. अभिनेत्रीचे वडील रवी टंडन हे हिंदी चित्रपट जगतातील प्रसिद्ध दिग्दर्शक होते, त्यामुळे ते चित्रपट कलाकारांना भेटत असत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Raveena Tandon (@officialraveenatandon)

“>
रवीनाने आपल्या करीअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली असली तरी तिच्या नशिबाने तिला बॉलिवूड अभिनेत्री बनवले. तिने एका पीआर कंपनीत नोकरी करायला सुरुवात केली. तिथेच तिला चित्रपटाची ऑफर मिळाली. तिला कधीच अभिनेत्री व्हायचं नव्हतं. पण आजूबाजूचे लोक तिच्या सौंदर्याचे आणि लूकचे सतत कौतुक करू लागले होते.

एके दिवशी तिला दिग्दर्शक शंतनू शेयोरी यांचा फोन आला. त्यांना रवीनासोबत काम करण्याची इच्छा होती. पण रवीनाने ही ऑफर नाकारली. त्यावेळी अनेकांनी तिला सांगितले की प्रत्येकाला अशी संधी मिळत नाही, तरीही अभिनेत्रीने ते मान्य केले नाही.

यानंतर तिला ‘पत्थर के फूल’ची ऑफर आली. त्यावेळी मात्र तिने होकार दिला. या चित्रपटानंतर तिची बॉलिवूडमधील गाडी सुसाट सुटली. पुढे अभिनेत्रीने कधीच मागे वळून पाहिले नाही. आता रवीना बॉलिवूडच्या यशस्वी अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर तिला 4 मुले आहेत. 1995 मध्ये तिने दोन मुलींना दत्तक घेतले. त्यानंतर तिने 2004 मध्ये चित्रपट वितरक अनिल थडानी यांच्याशी लग्न केले, ज्यांच्यापासून तिला दोन मुले आहेत. रवीना 4 मुलांची आई आणि चांगली पत्नी देखील आहे.

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.