Headlines

गुरुद्वारा मध्ये भांडी धुताना दिसला “हा” प्रसिद्ध अभिनेता, फोटो पाहून चाहत्यांनी केले खूपच कौतुक !

सुप्रसिद्ध अभिनेता विद्युत जामवाल सध्या चर्चेचा विषय बनलेला आहे. विद्युतचा येणाऱ्या दिवसात नवीन चित्रपट देखील येत आहे. या चित्रपटाचे नाव ‘आईबी -71’ आहे. या चित्रपटामुळे हा अभिनेता हल्ली सगळीकडे आपल्याला पाहायला मिळतो आहे. या चित्रपटाचे प्रमोशन देखील मोठ्या प्रमाणावर होत आहे याच दरम्यान हा अभिनेता अमृतसर येथील प्रसिद्ध गोल्डन टेम्पल येथे देखील दिसला. यादरम्यान विद्युत ने जामवाल लंगर मध्ये जेवण केल्यानंतर भांडी देखील घासली.

भांडी घासताना याचे काही फोटो सोशल मीडियावर वायरल झालेले आहेत. या फोटोंना त्याचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात पसंती देखील देत आहे. विद्युत ने आपल्या चित्रपटाला यश मिळावे यासाठी गुरुद्वारामध्ये प्रार्थना देखील केली आहे तसेच येणाऱ्या चित्रपटामुळे त्याला चांगले यश मिळावे आणि त्याची प्रगती व्हावी या अनुषंगाने देखील त्याने आपले मस्तक गुरुद्वारा येथे टेकले.

असे म्हटले जात आहे की, विद्युत जामवाल आपला येणारा चित्रपट आयबी 7 च्या यशासाठी तसेच या चित्रपट यासाठी प्रार्थना करिता मंदिरात गेला होता, यावेळी विद्युत ने अमृतसर येथील सुवर्ण मंदिरामध्ये प्रार्थना देखील केली तसेच रिपोर्ट नुसार विद्युत ने लंगर मध्ये जाऊन काही भांडी देखील धुतली. हे भांडे धूत असताना त्याचे काही फोटो त्याच्या चाहत्या वर्गांनी क्लिक केले आणि सोशल मीडियावर वायरल देखील केले आहे. हे फोटो व्हायरल होत असतानाच त्याच्या चाहत्या वर्गांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केलेला आहे. अनेकांनी चांगल्या कॉमेंट्स देखील केलेल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vidyut Jammwal (@mevidyutjammwal)


विद्युत चे जे फोटो व्हायरल झालेले आहेत, त्या फोटोमध्ये विद्युत ने पांढऱ्या रंगाचे कपडे घातलेले आहे तसेच विद्युत भांडी घासताना -धुताना देखील आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे. एका युजरने या अभिनेत्याचे कौतुक देखील केले आहे तसेच सुवर्ण मंदिरामध्ये सोनेरी हृदय असणारा व्यक्ती असे देखील म्हटले आहे. हा माणूस नाही तर सुपरमॅन आहे. हाच खरा शक्तिमान आहे तसेच लव यू गुरुजी. मॅन विथ गोल्डन हार्ट विथ सोल. खूप सारे लव्ह अशा विविध प्रकारच्या सकारात्मक कमेंट्स आपल्याला या फोटो खाली पाहायला मिळत आहे. एकंदरीत त्याचे या कृतीमुळे तो चहात्या वर्गाच्या मनामध्ये वसलेला आहे असे म्हणायला हरकत नाही.

विद्युत च्या येणाऱ्या चित्रपटाबद्दल बोलायचे झाल्यास हा चित्रपट गंगा अपहरण वर आधारित असणार आहे तसेच या चित्रपटांमध्ये विद्युत इंटेलिजन्स ब्युरो ऑफिसर च्या भूमिकेमध्ये आपल्याला दिसणार आहे. या चित्रपटांमध्ये प्रसिद्ध अभिनेता अनुपम खेर आणि विशाल जेठवा यांची देखील महत्त्वाची भूमिका असणार आहे.

हा चित्रपट 1971 मध्ये झालेल्या गंगा अपहरण च्या कथेवर आधारित असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संकल्प रेड्डी द्वारे केले गेले आहे तसेच निर्माता म्हणून देखील विद्युत आपल्याला दिसून येणार आहे. निर्माता म्हणून पहिल्यांदाच हा अभिनेता आपल्याला या क्षेत्रात पदार्पण करताना दिसून येणार आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की विद्युत चा हा चित्रपट अनेकांना आवडेल आणि या चित्रपटाची कथा सत्य घटनेवर आधारित असल्याने अनेकांना नवीन माहिती देखील मिळेल अशी आशा देखील वर्तवण्यात येत आहे. एकंदरीत हा चित्रपट प्रेक्षकांना आवडेल असे म्हटले जात आहे. हा चित्रपट प्रदर्शित देखील झालेला आहे आणि या चित्रपटाला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मोठ्या प्रमाणावर मिळत आहे.

आतापर्यंत विद्युत जामवाल ने ‘बुलेटराजा’, ‘कमांडो’, ‘कमांडो-3’, ‘बादशाहो’, ‘जंगली’, ‘कमांडो-2’ सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका केलेली आहे हे सारे चित्रपट प्रेक्षकांनी आवर्जून पाहिले देखील आहेत व प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देखील लाभलेला आहे.