Headlines

केदारनाथच्या दर्शनाला पोहोचली सारा, शेअर केलेले फोटो पाहून चाहत्यांना आली सुशांत ची आठवण !!

आपल्या सर्वांना अभिनेत्री सारा माहिती आहे. अभिनेत्री साराने खूप कमी कालावधीमध्ये आपली विशिष्ट ओळख बॉलीवूड क्षेत्रामध्ये निर्माण केलेली आहे. तिने आतापर्यंत वेगवेगळे चित्रपट देखील केलेले आहे. या चित्रपटांमध्ये केलेल्या भूमिका अनेकांच्या लक्षात देखील आहे. तुम्हा सर्वांना 2018 मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट केदारनाथ माहिती असेल. या केदारनाथ चित्रपटाच्या माध्यमातूनच साराने आपल्या करिअरची सुरुवात केली होती.

अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, सारा अली खान ने आतापर्यंत अनेक चित्रपट केलेले आहेत. हे सारे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस देखील उतरलेले आहेत. जेव्हा कधी साराला चित्रपटातून वेळ मिळतो, तेव्हा ती हमखास बाहेरगावी फिरायला जात असते. नुकतीच सारा केदारनाथला गेलेली आहे.

केदारनाथला गेल्यावर तिने महादेवाचे दर्शन देखील घेतलेले आहे. सध्या केदारनाथचा आसपासचा परिसर हा पूर्णपणे बर्फाने व्यापलेला आहे. एकंदरीत तिकडचे सौंदर्य हे स्वर्गापेक्षा कमी दिसत नाहीये आणि म्हणूनच अनेक जण सध्या केदारनाथला जाण्याचा विचार देखील करत आहे. केदारनाथ ला गेल्यावर सारा अली खानने खूप सारे फोटो देखील काढलेले आहे. तेथील वेगवेगळ्या ठिकाणी सारा फिरत देखील आहे. यावेळी साराला अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आठवण देखील आली.

खरंतर सारा अली खानने सुशांत सिंह राजपूत सोबत चित्रपट केदारनाथचा द्वारे आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटांमध्ये केदारनाथचे अनेक दृश्य दाखवण्यात आलेले आहेत तसेच केदारनाथ या चित्रपटात सुशांत सोबत साराचे अनेक फोटो देखील व्हायरल झाले होते. आता जसे साराने केदारनाथ चे फोटो अपलोड केले तेव्हा अनेक चाहत्यांना सुशांत सिंह राजपूत ची आठवण आली.

सारा अली खान ने जे फोटो सोशल मीडियावर अपलोड केलेले आहे, त्या फोटो नुसार आपल्याला पाहायला मिळते की सारा वेगवेगळ्या ठिकाणी एन्जॉय करताना दिसत आहे. त्याचबरोबर यादरम्यान तिने बर्फाचा देखील आनंद घेतलेला आहे. जसे सारा ने हे सारे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले तेव्हा या फोटोवर लाईक कमेंट आणि शेअर चा अक्षरशः पाऊस पडलेला आहे.

अनेकांनी या फोटोवर ब्यूटिफुल, गॉर्जियस अशा प्रकारच्या कमेंट्स करून देखील कौतुकाचा वर्षाव केलेला आहे त्याचबरोबर हे फोटो शेअर करत असताना काही चाहत्यांनी सुशांत सिंह राजपूतला देखील आठवले आहे. त्याची आठवण काढली आहे. हे फोटो शेअर करत असताना साराने मनाला भावेल असे कॅप्शन देखील लिहिलेले आहे. साराने लिहिले आहे की, “मी जेव्हा येथे पहिल्यांदा आली होती, तेव्हा कधीच कॅमेऱ्याला समोर आली देखील नव्हती.. आता मी माझ्या कॅमेऱ्याशिवाय जीवनाची कल्पना देखील करू शकत नाही. धन्यवाद केदारनाथ बाबा..! आजी मी जे आहे ते तुमच्यामुळे आहे.

सारा अली खानच्या येणाऱ्या चित्रपटाबद्दल बोलायचे झाल्यास सारा काही दिवसापूर्वी आपल्याला “अतरंगी रे” या चित्रपटांमध्ये दिसली होती. या चित्रपटांमध्ये सारा सोबत अक्षय कुमार आणि दक्षिण अभिनेता धनुष देखील महत्त्वाच्या भूमिकेत होते. येणाऱ्या दिवसात सारा अली खानकडे अनेक नवीन प्रोजेक्ट आहेत. येणाऱ्या दिवसात आदित्य रॉय कपूर सोबत “मेट्रो इन दिनो” या चित्रपटांमध्ये देखील सारा दिसणार आहे. त्याचबरोबर “लुका चुपी” ” ए वतन मेरे वतन” मध्ये देखील आपल्याला सारा येणाऱ्या दिवसात पाहायला मिळेल.