Headlines

अजय देवगणची ऑन स्क्रीन मुलगी झाली गरोदर, डोहाळ जेवणाचा कार्यक्रम जोरात साजरा, पहा फोटोज !

इशिता दत्ता आणि वत्सल सेठ लवकरच आई वडील बनणार आहेत. नुकतेच त्यांच्या डोहाळे जेवणाचा एक कार्यक्रम देखील पार पडला. दोघेही आपला येणाऱ्या बाळाचे आतुरतेने वाट पाहत आहेत. दोघेही बाळाच्या येण्याच्या चाहूलने खूपच उत्सुक आहेत. दोघांनी नुकतेच एक फोटोशूट देखील केले. या फोटोशूट चे काही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर वायरल झालेले आहेत.

या इशिता च्या ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला जवळची मंडळी व नातेवाईक आप्तेष्ट उपस्थित होते. इशिता दत्ता ही अभिनेत्री तनुश्री दत्ताची लहान बहिण आहे. इशिता आणि अभिनेता वत्सल यांनी माध्यमांच्या प्रतिनिधी समोर वेगवेगळ्या प्रकारचे फोटो शूट देखील केले व तसेच काही पोज देखील दिल्या. या फोटोमुळे दोघे पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहेत. या दोघांचे फोटो खूपच सुंदर आलेले आहेत. इशिताच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसीचा ग्लो अगदीच दिसून येत होता. दोघांनीही ट्रॅडिशनल वेशभूषेमध्ये छान फोटो देखील काढले आहेत.

इशिता दत्ता गुलाबी रंगाच्या साडी मध्ये खूपच सुंदर दिसत होती. त्याचबरोबर या साडीवर इशिताने मॅचिंग असे सोनेरी रंगाचे ज्वेलरी देखील घातले होते यामुळे इशिताचा लुक अगदी उठून दिसत होता. या कार्यक्रमाच्या वेळी अभिनेता वत्सलने ऑफ वाईट रंगाचा कुर्ता घातला होता. या दोघांची जोडी अतिशय सुंदर दिसत होती. कार्यक्रम झाल्यानंतर या दोघांनी छान फोटोशूट देखील केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)


आम्ही आपणास सांगू इच्छितो की, वत्सल आणि इशिता हे दोघेही टेलिव्हिजन विश्वातील एक प्रसिद्ध जोडपे आहे. या दोघांच्या जोडीला चाहता वर्ग मोठ्या प्रमाणावर पसंती देतो. यांच्या फोटोवर आणि व्हिडिओवर कौतुकाचा वर्षाव देखील करतो. जर तुम्ही देखील यांचे फोटो पाहिले नसतील तर सोशल मीडिया अकाउंट वर जाऊन नक्की पाहू शकता. तुम्हाला देखील यांचे फोटोज आवडतील तसेच तुम्ही देखील हे फोटो शेअर केल्याशिवाय राहणार नाही.