आपल्या लेकीसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली, आणि माणसात तिला किस केलं, जाणून घ्या महेश भट्ट यांच प्रकरण !

bollyreport
3 Min Read

हिंदी इंडस्ट्रीचे प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक महेश भट्ट त्यांच्या शानदार चित्रपटांसोबतच त्यांच्या खासगी जीवनामुऴे सुद्धा ओळखले जातात. काही वेळेस त्याच्या बेताल वक्तव्यांमुळे त्यांना अनेकदा ट्रोल केले गेले. त्यांना बरेचदा सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. दिग्दर्शक महेश भट्ट यांनी त्यांच्या मुलीसोबतच लग्न करण्याची इच्छा व्यक्त केलेली तेव्हा ते बरेच चर्चेत होते.

महेश भट्ट यांचा संपूर्ण परिवार हा सिनेइंडस्ट्रीशी निगडीत आहे. सध्या त्यांच्या छोट्या लेकीची म्हणजेच आलिया भट्टची सर्वत्र जादू आहे. तर सर्वात मोठी मुलगी एकेकाळची प्रसिद्ध अभिनेत्री होती. एकदा महेश भट्ट यांनी पुजा भट्टसोबत मॅगझिनसाठी फोटोशूट केले होते. ज्यात त्यांनी एकमेकांच्या ओठांचे चुं’ब’न घेतले. तेव्हा त्या फोटोने इंडस्ट्रीमध्ये गोंधळ घातला होता. या बापलेकीच्या जोडीला त्यावेळी खूप ट्रोल केले होते. देशभरातून या फोटोला खूप विरोध झाला.

तो सगळा थांबवण्यासाठी शेवटी महेश भट्ट आणि पूजा भट्ट यांना एक प्रेस कॉन्फरंस ठेवावी लागली. प्रेस कॉन्फरंस नंतर प्रकरण थोडे शांत होईल असे त्या दोघांना वाटले होते मात्र मध्येच महेश यांनी, पुजा माझी मुलगी नसती तर मी तिच्याशी लग्न केलं असतं असं वक्तव्य केलं. त्यामुळे प्रकरण आणखीच तापलं. त्यावर मी डिप्रशनमध्ये होतो म्हणून असं बोललो अशी सारवासारव महेश यांनी केली. त्यावेळी लोकांनी त्यांना खूप सुनावले. किंबहूना आजही लोक त्यांना त्यावरु टोमणे मारत असतात.

वयाच्या 20 व्या वर्षी महेश भट्ट यांनी लोरेन ब्राइटसोबत लग्न केले. त्यानंतर त्यांनी स्वताचे नाव बदलून किरण भट्ट असे केले. लोरेन आणि महेश भट्ट यांना पूजा भट्ट आणि राहुल भट्ट ही दोन मुले झाली. दोन मुलं झाल्यावरही महेश यांचे नाव परवीन बॉबी सोबत जोडले गेले. हे दोघे खूप काळ एकमेकांना डेट करत होते.

परवीनसाठी महेश त्यांच्या पत्नीपासूनसुद्धा वेगळे झाल्याचे म्हटले जाते.पण परवीनसोबत त्यांचा ब्रेकअप झाला. त्यानंतर त्यांनी सोनी राजदानसोबत लग्न केले. त्यांच्यापासून महेश भट्टना आलिया आणि शाहीन भट्टचा जन्म झाला. त्यानंतर सुद्धा त्यांचे अनेकींशी नाव जोडले गेले. त्यांच्या करीअरबद्दल बोलायचे झाल्यास ‘हम है राही प्यार के’, ‘गु’म’रा’ह’, ‘चाहत’, ‘नाम’, ‘राज’, ‘म’र्ड’र’, ‘जख्म’, ‘जि’स्म’, ‘दिल है कि मानता नहीं’, ‘आशिकी’, ‘सड़क’, ‘सारांश’ आणि ‘अर्थ’असे चित्रपट इंडस्ट्रीला दिले आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.