Headlines

सलमान खानच्या वडिलांनी सांगितले सलमान खानचे का मुलींसोबत जास्त दिवस संबंध टिकत नाहीत, जाणून घ्या !

बॉलिवूडचा भाईजान सुपरस्टार सलमानखानच्या स्टाईलची आणि अॅक्टींगचे अनेक दिवाने आहेत. सलमान खान नेहमीच त्याच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल लाईफ मुळे चर्चेत असतो. या सर्वांमध्ये सर्वाधिक चालणारा विषय म्हणजे त्याची लव्ह लाईफ किंवा त्याच्या आयुष्यात आलेल्या सुंदर मुली. पण एवढे असुनही त्याचे अजुनही लग्न झालेले नाही. अनेकदा प्रेमात पडुन ही सलमान खानचे प्रेम अधुरे राहते.

सलमानची आई सलमा खान मुळे त्याचे लग्न होत नसल्याचे सलमानच्या वडिलांनी सांगितले –
सलमानचे वडिल सलीम खान यांनी एका मुलाखतीत सलमानचे लग्न का होत नाही याबद्दल सांगितले. सलीम खान यांनी सलमानची आई सलमा खान यांना याबाबत कारणीभुत ठरवले. चला तर जाणुन घेऊ या मागील कारण, सलमान खान एकदा त्याच्या आई-वडिलांसोबत बॉलिवूडची प्रसिद्ध दिग्दर्शक आणि कॉरियोग्राफर फराह खानचा शो मेरे बीच मध्ये पाहुणे म्हणुन गेले होते. या शो दरम्यान सलमान च्या वडिलांनी सलमानच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही खुलासे केले. त्यावेळी त्यांचे संपुर्ण कुटुंब विनोदी ढंगात दिसुन आले.

सलमान त्याच्या आईवडिलांच्या खुप जवळचा , अजुनही एकाच घरात राहतात एकत्र –
फराह खान सोबत बोलताना सलमानच्या आईने सांगितले कि सलमानच्या आयुष्यात जितक्या मुली आल्या त्या सगळ्यांसोबत त्याचे खुप चांगले नाते होते. तेव्हा सलमानच्या वडिलांनी मध्येच मजेत म्हटले की सलमानचे सर्वाधिक नुकसान हे त्याच्या आईमुळेच झाले आहे. सलीम खान यांचे असे बोलणे ऐकुन तेथील उपस्थित सर्वजण हसु लागले. पुढे सलीम म्हणाले की त्याच्या आईनेच त्याचे सर्वाधिक नुकसान केले आहे कारण जेव्हा केव्हा सलमान खान त्याची गर्लफ्रेंड पसंत करतो त्यावेळी तिच्यामध्ये तो त्याची आई शोधतो. त्यामुळे प्रत्येक मुलगी त्याला सोडुन निघुन जाते.

शो दरम्यान सलीम खान यांनी सलमानच्या लग्नावर केले विनोद –
विनोदी ढंगात सलीम खान पुढे म्हणाले कि, सलमानला क्वचितच एखादी मुलगी त्याच्या आईप्रमाणे प्रेम देऊ शकेल. आणि जेव्हा केव्हा एखाद्या मुली मध्ये जर तो त्याची आई शोधु लागेल तेव्हा ती मुलगी त्याला सोडुनच जाईल. सलमान खान त्याच्या आई वडिलांच्या खुप जवळचा आहे. तो त्याच्या आईवडिलांना खुप चांगले मित्र मानतो. त्यामुळेच तो आता पर्यंत त्याच्या आईवडिलांसोबतच राहतो.

या अभिनेत्रींसोबत होते सलमानचे रिलेशनशिप –
सलमानच्या काही फेमस अफेअर बद्दल बोलायचे झाल्यास त्याचे सर्वात पहिले प्रेम होते बॉलिवुड अभिनेत्री संगिता बिजलानी होती. ते दोघे अनेक वर्षे एकमेकांना डेट करत होते. त्या दोघांच्या लग्नाच्या पत्रिका देखील छापल्या गेल्याचे म्हटले जाते. पण तरीही त्यांचे नाते तुटले आणि दोघांचेही मार्ग वेगळे झाले. संगिता बिजलानी सोबत नाते तुटल्यावर सलमानच्या आयुष्यात आली पाकिस्तानी अभिनेत्री सोमा अली खान. या दोघांनी देखील एकमेकांना खुप वेळ डेट केले. पण तरीही त्यांचे नाते तुटले.

सोमाशी ब्रेकअप झाल्यावर सलमानच्या आयुष्यात आली विश्वसुंदरी ऐश्वर्या राय. या दोघांच्या प्रेमाच्या आणि ब्रेकअपच्या चर्चा खुप झाल्या. पण तिच्याशीही त्याचा ब्रेक अप झाला. त्यानंतर सलमानच्या आयुष्यात आली अभिनेत्री कॅटरीना कॅफ. या व्यतिरिक्तही सलमानच्या आयुष्यात काही मुली येऊन गेल्या. सलमानच्या येत्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास सध्या त्याचे टायगर ३ चे शुटींग चालु आहे. तसेच तो लवकर बिग बॉस १५ मध्ये होस्टींग करताना दिसणार आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !