सध्या कोरोना च्या संक्रमणामुळे पंतप्रधान मोदी यांनी संपूर्ण देश लॉक डाऊन केला आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या विरंगुळ्यासाठी दूरदर्शन वाहिनीवर रामायण आणि महाभारत या मालिका पुन्हा प्रक्षेपित होऊ लागल्या आहेत. यामुळे या मालिकेतील कलाकार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
बी आर चोपडा यांच्या महाभारत या मालिकेबद्दल बोलायचे झाल्यास मालिकेतील अर्जुनाची भूमिका फिरोज खान यांनी साकारली होती. आज या मालिकेला इतकी वर्ष झाली तरीही फिरोज खान यांना लोक अर्जुन म्हणूनच ओळखतात. महाभारत मालिके च्या ऑडिशन मध्ये निवड झाल्यानंतर त्यांनी स्वतःचे नाव फिरोज खान बदलून अर्जुन असे करून घेतले होते.
महाभारत मालिकेचे पटकथाकार आणि संवाद लेखक डॉ. राही मासूम रजा यांनी फिरोज यांना सांगितले की तुझी २३ हजार लोकांमधून नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे तुझे नावं अर्जुन च असायला हवे. एवढेच नव्हे तर तू अर्जूना सारखाच वाटतोस शिवाय इंडस्ट्री मध्ये सुद्धा अर्जुन नावाचे कोणीच नाही. त्यांचे बोलणे ऐकून फिरोज यांनी स्वतः चे नाव बदलून ते अर्जुन केले.
अर्जुनने महाभारत मालिके व्यतिरिक्त चित्रपटांत सुद्धा काम केले आहे. १९८४ मध्ये आलेल्या मंजिल- मंजिल या चित्रपटा द्वारे त्यांनी फिल्म इंडस्ट्री मध्ये पाऊल ठेवले. त्यानंतर १९८८ मध्ये त्यांना महाभारत या मालिकेत अर्जुनाची भूमिका करण्याची संधी मिळाली. महाभारत या मालिकेचे प्रसारण ऑक्टोबर १९८८ पासून ते जून १९९० पर्यंत चालू होते.
महाभारत मालिकेत काम करण्याची संधी दिल्या बद्दल अर्जुन बी आर चोपडा यांचे आभार मानतात.
हे वाचा – राम आणि रावण यांची मैत्री सोशल मीडियावर गाजत आहे, काय आहे प्रकरण जाणून घ्या !एका मुलाखतीत अर्जुन यांनी सांगितले होते की, मी आज देखील अर्जुन याच नावाने ओळखला जातो. जसे अमिताभ बच्चन हे जंजीर या चित्रपटासाठी, धर्मेंद्र फुल ओर पत्थर या चित्रपटासाठी, अमजाद खान शोले या चित्रपटासाठी, विनोद खन्ना काच्चे धागे या चित्रपटासाठी तसाच मी महाभारतातील अर्जूनासाठी.
हे वाचा – रामानंद सागर यांच्या या सवयीमुळे सेटवर रागात असायचे रामायणमधील लक्ष्मण !अर्जुन यांना पुन्हा एकदा महाभारत मालिकेतील भूमिके प्रमाणे एक भूमिका ऑफर झाली होती. पण त्यांनी ती नाकारली कारण त्यांना एकाच पठडीतल्या भूमिकेत अडकायचे नव्हते. त्यांनी त्यांच्या करीयर मध्ये २६० हून अधिक चित्रपट केले आहेत. यामध्ये जिगर, तिरंगा, आदमी, फुल ओर अंगारे, मिस्टर आजाद, करण अर्जुन, मेहंदी, जोडी नंबर वन, आणि यमला पगला दिवाना २ यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !