Headlines

दारासिंह यांना अशा प्रकारे मिळाला हनुमानाचा रोल, मुलगा विंदू सिंह याने सांगितली कहाणी !

सध्या कोरोना मुळे २१ दिवसांसाठी लॉक डाऊन करण्यात आले आहे. या २१ दिवसांच्या काळात प्रेक्षकांच्या विरांगुळ्या साठी सरकारने पुन्हा जुन्या काही मालिका दाखवण्याचा निर्णय घेतला. यात प्रामुख्याने रामायण आणि महाभारत या मालिकांसाठी प्रेक्षक खूप उत्सुक असलेले दिसतात.
यातच दारासिंह यांची हनुमान बनण्याची कहाणी त्यांचा मुलगा विंदू दारासिंह यांनी सांगितली. विंदू यांनी सांगितले की, ही रामानंद सागर यांची रामायण मालिका सुरू होण्या आधीच गोष्ट आहे. १९७६ दिग्दर्शक चंद्रकांत यांनी बजरंग बली नावाचा चित्रपट बनवला होता. या चित्रपटात माझ्या वडिलांना हनुमानाचा रोल दिला गेला होता. त्यावेळी हा चित्रपट जय संतोषी मा या चित्रपटात एवढाच सुपरहिट ठरला. आणि या चित्रपटामुळे माझे वडील घराघरात पवनपुत्र हनुमान म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यानंतर अकरा वर्षांनी रामायण ही मालिका आली.
रामानंद सागर यांना आम्ही पापाजी म्हणून हाक मारायचो. त्यांनी रामायण सिरीयल बनवायचा विडा उचलला होता. त्यावेळी रामायण मालिकेत दीपिका चिखलिया या सीतेची भूमिका साकारण्यास पहिली पसंती होत्या. पण रामाची भूमिका निभावण्यासाठी अरुण गोविल हे पहिली पसंती नव्हते. पापा जी यांना म्हणजेच नाम आनंद सागर यांना एक दिवस रात्री स्वप्न पडले आणि स्वप्नात त्यांनी माझ्या वडिलांना हनुमानाच्या रूपात बघितले. आणि लगेच दुसऱ्या दिवशी त्यांनी माझ्या वडिलांना बोलावून हा रोल ऑफर केला.
पापाजी यांना त्यावेळी कोणीच नाही म्हणू शकत नव्हते. पण वर्षानुवर्षे कुस्ती खेळून माझ्या वडिलांचे गुडघे कमजोर झाले होते. त्यावेळी माझे वडील साठ वर्षांचे होते. पण माझ्या वडिलांनी हनुमानाची भूमिका निभावली. रामायण मालिकेने हनुमान स्वरूपी दारासिंह यांना अमर करून टाकले. त्यानंतर दारासिंह यांनी बी आर चोपडा यांच्या महाभारतात सुद्धा हनुमानाची भूमिका साकारली.
विंदू यांनी जुन्या आठवणी ताज्या घरात सांगितले की, माझे वडील जोपर्यंत जिवंत होते तोपर्यंत ते हनुमानाची भूमिका करत होते. त्यांच्या निधनानंतर ही जबाबदारी माझ्यावर आली. १९९६ मध्ये आलेल्या जय वीर हनुमान या मालिकेसाठी मला हनुमानाची भूमिका ऑफर केली गेली. माझ्या वडिलांनी हनुमानाच्या भूमिकेला एका वेगळ्याच टोकावर नेऊन ठेवले आहे. त्यामुळे मी ही भूमिका नीट साकारू शकेन की नाही याची धास्ती मला सतावत होती. पण मी त्यावेळी ते एक चॅलेंज म्हणून स्वीकारले आणि भूमिका केली. आता दरवर्षी दिल्लीला रामलीला’मध्ये मला हनुमानाची भूमिका करण्यासाठी बोलावले जाते.
तेलगु चित्रपटात मी हनुमानाची सर्वोत्तम भूमिका केली होती. हा चित्रपट महान बापू यांनी दिग्दर्शित केला होता. पुन्हा सुरू झालेल्या रामायण मालिकेने सागर यांच्या परिवारास आर्थिक रित्या पुन्हा मजबूत केल्याचा मला आनंद वाटतो असे विंदू यांनी सांगितले. या मालिके संबंधित प्रत्येक कलाकार यशाच्या शिखरावर पोहोचला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *