Headlines

विक्की कौशलने जेव्हा सलमान खानच्या समोरच कॅटरिनाला घातली लग्नाची मागणी !

विक्की कौशल हे नाव आता बॉलिवूड क्षेत्राला नवीन नाहीये .सर्वजण या नावाला ओळखतात त्याचा उरी हा चित्रपटाने भारतातच नव्हे तर विदेशात सुद्धा धुमाकूळ घातला.चित्रपटात केलेल्या अभिनयामुळे विक्की चर्चेत असतोच पण आज सुद्धा खूप काळानंतर विक्की हा प्रत्येकाच्या चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामागील कारण सुद्धा तसेच आहे. चला तर जाणून घेऊया.
सध्याच्या काळात बॉलीवुडच्या गल्ली बोळ्यांमध्ये एक चर्चा खूपच वेगाने पसरत आहे ती म्हणजे कटरीना कैफ आणि विक्की कौशल यांच्या प्रेम प्रकरणाची. आपणास सांगू इच्छितो कि, गेल्या अनेक दिवसापासून दोघांच्या प्रेम प्रकरणाची चर्चा समोर येत आहे. असे म्हंटले जात आहे कि, हे दोघे या दिवसांत एकमेकांना डेट करत आहेत. फक्त एवढेच नाही तर कटरीना कैफ आणि विक्की कौशल यांचे काही फोटो सुद्धा सोशल मीडिया वर व्हायरल होत आहेत.
जे त्यांचा चाहत्यांना खूप आवडत आहेत. खरंतर याबद्दल दोघांना विचारणा केली असता दोघांनी यावर बोलण्याचे टाळले. ते दोघे एकमेकांचे आम्ही चांगले मित्र आहोत असेच सांगतात. नुकतेच काही काळापूर्वी अभिनेता विक्की कौशलने या बातम्यांना खारिज केले होते. त्यांनी सगळ्या बातम्यांना नकार देत, हे सगळे अफवा असल्याचे सांगितले. अशातच आता कटरीना कैफ आणि विक्की कौशल यांचा एक वीडियो व्हायरल होत आहे, ज्यात विक्की सर्वांसमोर अभिनेत्री कटरीना कैफला सगळ्यांसमोर प्रपोज करताना दिसत आहेत.
एवढंच नाही तर विक्की कौशलने कटरीना कैफला सलमान खान यांच्या समोर प्रपोज करण्याची हिम्मत दाखवली. हा व्हिडिओ एका अवॉर्ड कार्यक्रमाचा आहे, या कार्यक्रमाचे निवेदन विक्की करत होता. या व्हिडिओत विक्की आणि कटरीना कैफ दोघे व्यासपीठावर होते. या व्हिडिओत विक्की कौशल कटरीनाला म्हणतात कि, तुम्ही एखाद्या चांगला विक्की कौशलला शोधून त्याच्याशी विवाह का करत नाही? ‘ तो पुढे म्हणतो कि सध्या तर विवाहाचा हंगाम सुद्धा आहे तर मी विचार केला कि तुम्हाला एकदा विचारून पाहावे, माझ्याशी विवाह कराल? या दरम्यान हे ऐकून सगळे आश्चर्यचकित होतात आणि नंतर पोट धरून हसू लागतात.
तिकडे सलमान खान आपली बहीण अर्पिता खान शर्मा यांच्या खांद्यावर पडतात. मित्रांनो आपण तर हे जाणताच कि एक काळ होता जेव्हा सलमान खान आणि कटरीना कैफ एकदुसऱ्यासोबत नातेसंबंधात होते. याच दरम्यान कटरीनाच्या आयुष्यात रणबीर कपूरचा प्रवेश झाला आणि त्या सलमानला सोडून निघुन गेली मग रणबीर सोबत ब्रेकअप झाल्यानंतर कटरीना पुन्हा सलमान यांच्याकडे परत आली.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *