नवीन गाडी घेतली असेल तर नंबर प्लेट वर फक्त AF टाका, कुणीही तुमची गाडी अडवणार नाही !

13858

जर कोणी नवीन बाईक किंवा कार घेतली तर तुम्ही बघितले असेल की त्यांना एक टेंपररी नंबर दिला जातो. आणि गाडीच्या पाठी नंबर प्लेटच्या जागी काही काळासाठी A/F असे लिहीले जाते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का ? असे का लिहिले जात असेल ? या लिहिण्या मागचा अर्थ काय ?

आज आम्ही तुम्हाला छोटीशी परंतु महत्वपूर्ण अशी माहिती देणार आहोत. भारतात कोणत्याही वाहनास सर्वप्रथम मोटर वाहन अधिनियम १९८९ मध्ये रजिस्टर करावे लागते. जेव्हा आपण कोणतेही वाहन खरेदी करतो तेव्हा त्या वाहनाचे ऑफिसिअल कागदपत्र तयार केले जातात. त्यानंतरच ती गाडी रस्त्यावर चालवण्यास परवानगी मिळते.

A/F चा अर्थ म्हणजे Applied For. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास वाहन खरेदी केल्यावर त्या वाहनाच्या अधिकृत नंबर साठी अप्लाय केले आहे. त्यामुळे जोपर्यंत त्या गाडीचा पर्मनंट नंबर मिळत नाही तोपर्यंत त्या गाडीवर A/F असे लिहीले जाते. कोणतेही वाहन खरेदी केल्यावर फक्त एक आठड्यापर्यंतच गाडीवर A/F असे लिहु शकता. एक आठड्यानंतर तुम्हाला तुमचा पर्मनंट नंबर मिळतो.

केंद्रीय मोटर वाहन नियमात कोणताही नागरिक हा नंबर प्लेट नसेल तर गाडी चालवू शकत नाही. नंबर प्लेट नसताना गाडी चालवल्यास तो कायद्याने गुन्हा ठरतो. तुम्ही तो अपराध केल्यास तुम्हाला १०,००० रुपयांपर्यंत दंड भरावा लागेल.

शिवाय तुमचे वाहन सुद्धा जप्त केले जाऊ शकते. त्यामुळे तुम्ही नवीन वाहन खरेदी केल्यावर लगेच त्या वाहनाचे अधिकृत रजिस्ट्रेशन करून घ्या.