Headlines

सलमान खानने असे काय केले की, कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर आपापसातील भांडण विसरून एक झाले, जाणून घ्या !

प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर मागील काही काळापासून त्यांच्यात झालेल्या भांडणामुळे एकमेकांवर रागावले होते. यांच्यातील आपापसातील मतभेदांमुळे प्रसिद्धीच्या शिखरावर उच्च स्थानी पोहोचलेला शो बंद झाला होता. त्यानंतर सलमान खान ने स्वतः कपिल शर्माचा शो निर्मित करून हा शो पुन्हा एकदा टीव्ही इंडस्ट्री मधील सर्वाधिक कमाई करणारा शो बनवला.
त्यानंतर सलमान खान न्युज सूनील ग्रोवर ला भारत या चित्रपटामध्ये एक मोठी भूमिका साकारण्याची संधी दिली. सोशल मीडियावर या दोघांना अनेकदा एकमेकांच्या विरुद्ध पाहिले गेले मात्र यावेळी त्यांच्यातील भांडण विसरून ते दोघे एकमेकांसोबत फोटो काढताना दिसून आले.

कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर या दोघांना पुन्हा एकदा एक करण्यात सलमान खानचा मोठा हात आहे. गेल्यावर्षी २० डिसेंबर हा दिवस खान परिवारासाठी खूप खास होता कारण त्यादिवशी सलमान खानचा बहुचर्चित दबंग 3 हा चित्रपट प्रदर्शित झाला. शिवाय त्याच दिवशी सलमान खान चा भाऊ सोहेल खान चा वाढदिवस होता. या खास दिवशी सोहेल खानच्या वाढदिवसाच्या पार्टीचे आयोजन सलमान खानच्या घरी गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये ठेवले गेले होते.
येथेच भांडणानंतर दोन वर्षांनी कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर एका छताखाली दिसले. सलमान खानच्या आग्रहामुळे ते दोघे या पार्टीमध्ये सहभागी झाले होते. या दोघांचे भांडण मिटवण्यासाठी सलमान खानने त्या दोघांना एकत्र येऊन एक फोटो काढला. सध्या तो फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा फोटो इतर कोणी नाही तर खुद्द सलमान खानने त्याच्या सोशल मीडिया अकाउंट वर पोस्ट केला होता.
त्या दिवशी पार्टी मध्ये अरबाज खान ची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रिया, सनी लियोनी, डेनियल वेबर, रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया डिसूझा, हेलेन, सुनील शेट्टी, नेहा धुपिया, अंगद बेदी, जॅकी श्रॉफ, यूलीया वंतूर, हिमेश रेशमिया, आयुष शर्मा यांसारखे स्टार्स उपस्थित होते.
सलमान खानच्या दबंग ३ या चित्रपटात सलमान खान सोबत सोनाक्षी सिन्हा, अभिनेता दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर, सुदिप किच्चा यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी २४ करोड रुपयांचा गल्ला जमवला होता.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !