Headlines

हजारोंपेक्षा जास्त चित्रपटात काम करणारा “हा” अभिनेता अचानक कुठे गायब झाला, चला तर जाणून घेऊया !

चित्रपट हा समाज मनाचा आरसा असतो. चित्रपटांमध्ये केल्या जाणाऱ्या भूमिका आणि त्या भूमिका यशस्वीपणे पार पडणारे अभिनेते आपल्या सर्वांच्या लक्षात नेहमीच राहतात. असे काही अभिनेते आहेत जे त्यांच्या साध्या राहणीमानाने आणि निव्वळ विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटवतात असेच या चित्रपट सृष्टीमध्ये अनेक विनोदवीर आहेत. ज्यांनी आपल्या अतुलनीय भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य केले आहे.
चित्रपट विश्वातील कलाकार आपल्या अभिनय शैलीमुळे देशातच नाही तर परदेशात सुद्धा ओळखले जातात. आज आम्ही आपल्याला अशाच एका ताऱ्याबद्दल सांगणार आहोत  ज्यांनी हजारो चित्रपटात अभिनय केला आहे. दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये कदाचित एखादा सिनेमा असेल ज्या सिनेमांमध्ये या अभिनेत्याने काम केले नसावे.
दक्षिणच्या या महान विनोद वीर ताऱ्यांचे नाव आहे ब्रह्मानंदम. दाक्षिणात्य चित्रपटात सोबतच त्यांनी बॉलिवूडच्या अनेक चित्रपटात अभिनय केलेला आहे. एवढ्या चित्रपटात काम करून सुद्धा आता त्यांना काम करण्यासाठी चित्रपट मिळत नाही आहे. ब्रम्हानंदम नुकतेच एका रियलिटी कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून भूमिका बजावत आहे.

या कार्यक्रमातून बाहेर पडल्यावर एका रिपोर्टरने त्यांना विचारले कि आपण चित्रपट का करत नाही आहात? यावर ब्रम्हानंदम यांनी कोणतेच उत्तर दिले नाही. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करत त्यांनी या प्रश्नांचे उत्तर दिले.
ब्रम्हानंदम यांनी सांगितले की स्वास्थ्य चांगले न राहण्याच्या कारणामुळे ते चित्रपटांमध्ये हल्ली काम करत नाही. खरं तर या गोष्टीला धरून अनेक अंदाज वर्तवले जात आहेत. काही लोकांचे असे म्हणणे आहे की, प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या मानधनामध्ये वाढ केली आहे. काही लोकांचे असे म्हणणे आहे की, त्यांचे व्यवहार ठीक नाही आहे. त्यांना त्यांच्या प्रसिद्धीचा अहंकार झाला आहे. खरंतर जेवढ्या व्यक्ती तेवढ्याच निरनिराळया चर्चा.
चित्रपटांमध्ये उत्कृष्ट काम केल्यामुळे त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. तसेच सर्वाधिक स्क्रीन क्रेडिट मिळविणारा अभिनेता ठरल्यामुळे त्यांच्या कामगिरीची दखल गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनेही घेतली. त्यांच्या नावाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली. विशेष म्हणजे त्यांना फिल्मफेअर, सिनेमा अवॉर्ड्स आणि नंदी अवॉर्ड्सही मिळाले आहेत. कांचाना, डबल अटॅक, वेंकी, जलसा अश्या सुपरहिट चित्रपटात ब्रम्हानंदम यांनी काम केले आहे.
आम्ही तर या अभिनेत्याला लवकरात लवकर चित्रपटांमध्ये काम करतांना दिसू दे हीच आमची इच्छा आणि सर्व चाहत्यांना खळखळून पुन्हा हसवावे अशी आशा बाळगतो. आपल्याला वरील लेख आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका.