आपल्या मुलीच्या भविष्याची चिंता करू नका, पोस्टाच्या या योजनेअंतर्गत पैसे ३ पट वाढू शकतात !

bollyreport
3 Min Read

पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये आतापर्यंत ‘सुकन्या समृद्धी योजना’ ही सर्वाधिक मिळकत देण्याच्या बाबतीत अव्वल स्थानावर आहे. सुकन्या समृद्धी योजना साठी खाते उघडायचे असल्यास ते कोणत्याही पोस्ट ऑफिस मध्ये किंवा कोणत्याही कमर्शिअल बँकेत उघडू शकतो. साधारणपणे ज्या बँकेमध्ये पब्लिक प्रोविडेंट फंड खाते उघडण्याची सुविधा आहे तेथे सुकन्या समृद्धी योजना खाते उघडण्याची सुविधा असते. सध्या त्यामध्ये ७.६ टक्के व्याज मिळते.
केंद्र सरकारची सुकन्या समृद्धी योजना ही सध्याच्या काळात सर्वाधिक प्रसिद्ध अशी स्की म आहे. ही स्की म मुलींच्या भविष्याचा विचार करून चालवली जाते. विशेष बाब म्हणजे ही योजना २१ वर्षांची असते, परंतु पालकांनी या योजनेत केवळ १४ वर्षे गुंतवणूक करावी लागेल. या योजनेत आपण गुंतविलेली रक्कम मॅच्युअर झाल्यानंतर आपल्याला ती तीन पटीने परत मिळते. या योजनेत एका वर्षात ७.६% दराने ६४ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येईल.
सध्या सुकन्या सुविधा योजनेत ७.६% व्याजदर नक्की केला आहे. या योजनेत अधिक तर १.५० लाख रुपये एका वर्षात जमा करू शकतो. म्हणजेच दर महिना १२५०० रुपये. समजा जर १४ वर्षात हे व्याज दर कायम राहिले आणि एका वर्षात तुम्ही दरमहा १२,५०० रुपये किंवा वार्षिक १.५० लाख रुपयांची (जास्तीत जास्त रक्कम) गुंतवणूक कराल तर १४ वर्षांमध्ये तुम्ही २१ लाख रुपये जमा कराल.

१४ वर्षात ७.६ % व्याजदर या हिशोबाने ही रक्कम पुढे ३७,९८,२२५ रुपये इतकी होईल. यानंतर सात वर्षांनी वार्षिक कंपाउंडिंग ७.६% व्याजदर या हिशोबाने मिळकत मिळेल. २१ वर्षांनी म्हणजेच मॅच्युरिटी वर ही रक्कम ६३,४२,५८९ रुपये होईल. म्हणजेच २१ लाख रुपयांची रक्कम मॅच्युरिटी नंतर ६३.५ लाख रुपये होईल. याचाच अर्थ तुम्हाला ४२.५ लाख रुपये व्याज रूपात फायदा होईल.
या प्रकारे अकाउंट ओपन करावे –
सुकन्या समृद्धी योजनेत खाते उघडायचे असल्यास सर्वप्रथम पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन फॉर्म घ्यावा. हा फॉर्म घेण्यासाठी मुलीचे बर्थ सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. सोबतच पालकांचे ओळखपत्र आवश्यक आहे. ओळख पत्रामध्ये पॅन कार्ड, आधार कार्ड, राशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, पासपोर्ट यापैकी कोणतेही डॉक्युमेंट्स चालतील. अ‍ॅड्रेस प्रूफसाठी पालकांना कागदपत्रेदेखील द्यावी लागतील. यातही ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, विजेचे बिल किंवा रेशन कार्ड चालतील. बँक किंवा पोस्ट ऑफिस मधून तुमच्या डॉक्युमेंट्स चे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचे खाते उघडले जाईल. खाते उघडल्यानंतर त्या खाते धारकास पासबुक मिळेल.
कोणताही भारतीय नागरिक सुकन्या समृद्धि योजनेत मुलीच्या नावावर खाते उघडू शकतो. मात्र या योजनेसाठी मुलीचे वय १० वर्षांहून कमी असणे जरुरी आहे. एकाच परिवारातील दोन मुलींच्या नावावर खाते उघडले जाऊ शकते. जर दोन हून अधिक मुलींच्या नावावर खाते उघडायचे असेल तर जन्मदाखल्यासोबत प्रतिज्ञापत्र देणे आवश्यक आहे. सुकन्या समृध्दी योजनेंतर्गत गुंतवणूक आयकर कायद्याच्या कलम ८० C अंतर्गत करात सूट मिळू शकते. मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर तिच्या शिक्षणासाठी किंवा तिच्या लग्नासाठी तुम्ही तुमच्या जमा रकमेतून ५०% रक्कम काढू शकता.
सुकन्या समृद्धी योजनेत वार्षिक कमीत कमी २५० रुपये जमा केले जाऊ शकतात. याआधी वार्षिक १००० रुपये भरणे आवश्यक होते मात्र कालांतराने ही रक्कम कमीत कमी २५० रुपये आणि जास्तीत जास्त १.५० लाख रुपये केली गेली.

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.