‘पवित्र रिश्ता’ या झी टीव्हीवरील प्रसिद्ध मालिकेमधून दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्यासोबत मुख्य भूमिकेतील अंकिता लोखंडे ही नेहमीच चर्चेत असते. आपल्या साध्या व निरागस अभिनयाने तिने अनेक चाहत्यांची मन जिंकली आहेत. २००५ साली अंकिताने तिचं उच्चशिक्षण पूर्ण करून ती इंदोरहून मुंबईत तिच्या अभिनयाची आवड जोपासण्यासाठी आली.
‘पवित्र रिश्ता’ या मालिकेनंतर ती ‘झलक दिखला जा’ चौथे पर्व, कॉमेडी सर्कस, एक थी नायका या कार्यक्रमांमध्ये तिने काम केले आहे. सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडेच्या नात्याबद्दल तर सर्वज्ञात आहे. २०१६ मध्ये सुशांत आणि ती वेगळे झाल्यावर २०१९ मध्ये उद्योगपती विक्की जैन सोबत तिचे रिलेशन असल्याचे तिने सांगितले.
अंकिता आणि तिची बहीण अशिता या दोघींनी आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवरून काही फोटो शेयर केले आहेत. या फोटोवरून अंकिताच्या लग्नाबद्दलची चर्चा सुरु झाली आहे. या फोटोमध्ये अंकिताच्या हातावर मेहंदी काढताना दिसत आहे. यावरून काही जणांनी अंकिता लपून आपल्या मेहंदीचा कार्यक्रम करत असल्याचे विधान केले आहे. फोटोमध्ये अगदी साध्या ड्रेसमध्ये अंकिता दिसत आहे, सोबतच तिने डोक्यावर गजरा घातला आहे.
हे फोटो तिचा प्रियकर विक्की जैनसोबत लग्नासंबंधित प्रश्न विचारण्यासाठी चाहत्यांनी सुरुवात केली आहे. अंकिताची बहीण अशिता हिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडीओ शेयर केला आहे. या व्हिडिओमध्ये अंकिताच्या हातावर मेहंदी काढताना दिसत आहे आणि अशिता प्रेमाने अंकिताला मिठी मारताना दिसत आहे. अंकिताने हा फोटो इंस्टाग्रामवर QandA सेशन दरम्यान शेयर केली होती.
अंकिता लोखंडे ही विक्की जैनला फार काळापासून डेट करत आहे आणि यातच दोघांच्या लग्नाची बातमी समोरं येतं आहे. अशातच विक्कीच्या नावाची मेहंदी हातावर काढताना अंकिता फारच आनंदी दिसत आहे. सुशांत सिंग राजूपतच्या बर्थ एनिवर्सरीनिमित्त अंकिताने सुशांतचे काही जुने व्हिडीओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !