Headlines

या आठ प्रकारच्या व्यक्तींना असतो हार्ट अटॅक येण्याचा सर्वाधिक धोका… अजून वेळ गेली नाही आत्ताच व्हा सावधान !

आज-काल हार्ट अटॅक कधी कोणाला येईल हे सांगू शकत नाही. पूर्वी उतारवयातील व्यक्तींना हार्ट अटॅक येण्याचा धोका अधिक असायचा. पण आता नुकतच तारुण्यात प्रवेश केलेल्या मुलांनादेखील हार्ट अटॅक येतो. यामध्ये शरीराने जाड असलेल्या व्यक्तींना हार्ट अटॅकचा धोका अधिक संभवतो. त्यामुळे जर आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली नाही तर हार्ट अटॅकचा धोका कधीही आणि कोणालाही येऊ शकतो.

त्यामुळे सर्वांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी त्यांनी वेळोवेळी डॉक्टरांकडून स्वतःची तपासणी करावी, योग्य आहाराचे सेवन करावे, व नियमित व्यायाम करावा. यामुळे हार्टअटॅक येण्याचा धोका टळतो. हार्ट अटॅक येण्याचा धोका पुढील लोकांमध्ये संभावतो.

१) जाड व्यक्ती – मंडळी काही व्यक्तींचे वजन गरजे पेक्षा जास्त असते. त्यामुळे ते जाड दिसतात. या व्यक्ती वेळेतच स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत नाहीत शिवाय कोणत्याही प्रकारचा व्यायाम सुद्धा करत नाहीत. यामुळे त्यांचे डायबिटीज आणि कोलेस्ट्रॉल वाढते. यामुळेच अशा व्यक्तींना हार्ट अटॅक येण्याचा धोका अधिक असतो.

२) डायबिटीज – ज्या व्यक्तींना डायबेटीसचा त्रास असतो. त्यांच्या शरीराच्या र*क्तवाहिन्या कॉलेस्ट्रोलमुळे आकुंचित झालेल्या असतात. त्यामुळे त्यातुन र*क्तपुरवठा ह्रदयापर्यंत नीट पोहोचत नाही. ह्रदयापर्यंत जर र*क्त पोहाचले नाही तर मग ह्रदयविकाराचा झटका येण्याची तीव्र शक्यता असते.

3) जेनेटिक – ज्या व्यक्तींच्या आईवडिलांना ह्रदयासंबधी समस्या असतात त्यांना मुलांना पण या समस्या होऊ शकतात. यामुळेच ही समस्या आपल्याला उद्भवु नये यासाठी आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी योग्य आहाराचे सेवन करावे तसेच नियमित व्यायाम करावा.

4) बारीक व्यक्ती – जे लोक प्रमाणापेक्षा बारिक असतात. त्या व्यक्ती कमजोर असतात. आणि जास्त अॅक्टिव्ह सुद्धा नसतात. त्यामुळे त्याच्यात हार्ट अटॅकची शक्याता जास्त असते. अशातच जर त्या व्यक्तींना डायबेटीस आणि ब्लडप्रेशरचा त्रास असेल तर त्यांना हार्ट अटॅकचा धोका अधिक असतो.

5) धुम्रपान करणाऱ्या व्यक्ती – काही लोकांना धुम्रपान करण्याची वाईट सवय असते. सततच्या धुम्रपानामुळे त्यांच्या ह्रदयातुन शरीराला र*क्त पुरवणाऱ्या र*क्तवाहिन्या ब्लॉक होउन जातात. त्यामुळे हार्ट अटॅक येतो.

6) हाय ब्लडप्रेशर – हाय ब्लडप्रेशर म्हणजे उच्च र*क्तदाब. ज्या व्यक्तीना हाय ब्लड प्रेशरचा अधिक त्रास असतो. त्या व्यक्तींच्या शरीरात कॉलेस्ट्रोल वाढतो. कॉलेस्ट्रोल वाढल्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो. हाय ब्लडप्रेशरचा माणसाच्या हृदयावर ताण येऊन हार्ट अटॅक येण्याची शक्यता खूप वाढते.

7) वाढते वय – आपले वय जसे वाढत जाते तसतसे शरीरातील अवयव कमजोर होत जातात. व कालांतराने निकामी होतात. शिवाय वाढत्या वयात जर आरोग्याकडे नीट लक्ष दिले नाही तर शरीरात कॉलेस्ट्रोलची मात्रा वाढते. यामुळे हार्ट अटॅक येण्याची शक्यता अधिक असते.

8) शारीरिक कमजोरी – अनेक जण फिजिकली अॅक्टिव्ह नसतात. योग्य वेळी योगा आणि व्यायाम करत नाही त्यामुळे कॉलेस्ट्रोल वाढते. त्यामुळे त्यांना हार्ट अटॅकचा धोका अधिक उद्भवतो. शरीराने कमजोर असणाऱ्या व्यक्तींनी नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !