रश्मिका मंदनाने होळीच्या दिवशी तिच्या चाहात्यांना दिला धक्का…गुपचूप कोणाच्या नावाची अंगठी घातली बोटात बघा !

bollyreport
3 Min Read

साऊथकडील अभिनेत्री रश्मिका मंदनाचा सध्या संपुर्ण देशात बोलबोला आहे. तिच्या सौंदर्यांचे अनेक चाहाते आहेत. तिच्या एकाएका फोटोंला अवघ्या काही वेळातच लाखोंमध्ये लाइक्स मिळतात. तिच्या सौंदर्यावर अनेक जण तिच्या फोटोवर कमेंट करत असतात. त्यामुळेच रश्मिकासंबंधीत अनेक बातम्या खुप व्हायरल होत असतात.

अशातच काही दिवसांपुर्वी या सुंदर अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे तो पाहुन तिच्या चाहात्यांचे मन तुटले आहे. तिचा तो फोटो पाहुन असे वाटते कि तिने गपचुप साखरपुडा उरकुन घेतला आहे. होळीच्या दिवशी रश्मिकाने तिच्या फॅन्सला हॅपी होली विश करताना तिचा सुंदर फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये अभिनेत्री तिच्या बोटातील सुंदर अंगठी फ्लॉंट करत होती. व त्यासोबत एक छान कॅप्शनपण दिले आहे. तो फोटो पाहुन तिच्या चाहात्यांना वाटते कि तिने साखरपुडा केला आहे.

रश्मिकाने तिच्या कॅप्शनमध्ये लिहीले होते कि, मी तुला मिळावले. ज्या कोणी मला ही रिंग पाठवली त्याला आता ते समजलं असेल कि मला ती रिंग मिळाली आहे. मी तुझा तो छोटासा मेसेजसुद्धा पुर्णपणे वाचला. ही अंगठी माझ्या बोटात अगदी बरोबर बसली आहे. आणि ती मला खुप आवडली सुद्धा आहे.

नक्की कोणी पाठवली ही अंगठी – रश्मिका मंदनाचा तो फोटो पाहिल्यानंतर तिच्या प्रेमासंबंधी अनेकांनी तिला प्रश्न विचारले. त्यानंतर तिच्या चाहात्यांची उत्सुकता मिटवण्यासाठी रश्मिकाने अजुन एक फोटो शेअर केला त्यात तिने सांगितली कि तिला ती अंगठी तिच्या बॉयफ्रेंडने नाही तर तिच्या स्विडनच्या फॅन्सच्या टीमने दिली आहे.

सोबत रश्मिकाने एक स्क्रिनशॉट शेअर करत म्हटले की ‘आह, मेरा दिल. मला असे म्हणायचे आहे की मला जगभरातून बरेच प्रेम आणि समर्थन मिळते. ही रिंग माझ्यासाठी चाहत्यांकडून वाढदिवसाची भेट आहे. हे खूप गोंडस आहे मी हे नेहमीच परिधान करीन.

स्वीडनच्या फॅन्सने ती अंगठी तिला वाढदिवसाचं गिफ्ट म्हणुन पाठवली होती. रश्मिकाचा ५ एप्रिलला वाढदिवस होऊन गेला. तिचा हा २५ वा वाढदिवस आहे. यासोबतच हल्ली रश्मिका विजय देवरकोंडाला डेट करत आहे. या दोघांची जोडी लोकांना खुप आवडते. या दोघांनी गीता गोविंदम आणि डियर कॉ’म’रे’ड यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यामुळे त्यांच्या अफेअर च्या चर्चासुद्धा होऊ लागल्या आहेत. काही दिवसांपुर्वी या कपल ला मुंबईत डिनर डेटला पाहिले गेले होते . त्यांचा तो फोटो खुप व्हायरल सुद्धा झाला होता.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.