Headlines

४५ वर्षाची मलायका बनणार का अर्जुन कपूरच्या बाळाची आई ? यावर मलायकाने दिले हे उत्तर !

कोरोनाच्या काळात जगभरातील लोक आपापल्या घरात कैद झाले असताना त्यांना विरंगुळा म्हणून सोशल मीडिया भरपूर कामी आला. घरातल्या घरात लोकांना सोशल मीडिया मार्फत अनेक चटपटीत विषय वाचता आले. यात बॉलिवूड सेलिब्रिटींचा आयुष्यातील लेख किंवा बातम्या वाचण्याकडे लोकांचा अधिक कल होता.

बॉलीवूड मध्ये अनेक लफडी, अनेक ब्रेकअप पॅचअप होत असतात. इथे कोणाची जोडी कोणासोबत लागेल सांगता येत नाही. त्यामुळे बॉलिवूडमध्ये चर्चेला विषय अनेक मिळतात. अशीच हल्ली एक जोडी भरपूर चर्चेत आहे ती म्हणजे मलाइका अरोरा आणि अर्जुन कपूर. सुरुवातीला या दोघांनी त्यांचे रिलेशनशिप लोकांपासून लपवून ठेवले मात्र आता हे दोघे खुलेआम लोकांसमोर एकत्र फिरतात, सोशल मीडियावर एकमेकांप्रतीचे प्रेम व्यक्त करतात. या दोघांनी त्यांच्या लग्नाचे प्लॅनिंग केले असल्याचे देखील म्हटले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मलाइका आणि अर्जुन च्या कुटुंबाने त्यांच्या नात्याला मान्यता दिली आहे. या दोघांना अनेकदा फॅमिली फंक्शन, डिनर, लन्चला एकत्र पाहिले गेले आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मलाइका चा १७ वर्षांचा मुलगा अरहानने सुद्धा अर्जुन कपूरला पसंत केले आहे. या दोघांमधील बॉण्डिंग सुद्धा खूप चांगले असल्याचे म्हटले जाते.

एका मुलाखतीत जेव्हा मलाइकाला अर्जुन च्या बाबतीत तिच्या मुलाची रिएक्शन विचारली गेली होती तेव्हा ती म्हणाली, मला असे वाटते कुठल्याही परिस्थितीचा सामना इमानदारीने करावा. आपल्या जवळील व्यक्तींना आपल्या आयुष्यात काय चालू आहे हे सांगणे गरजेचे आहे. तसेच ती गोष्ट त्यांना समजून घेण्यासाठी वेळ द्यावा. आमच्यात सुद्धा या सर्व गोष्टींवर बोलणे झाले. आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की आता सर्व गोष्टी पहिल्याहून खूप चांगल्या आहेत. मलाइका चा १७ वर्षांचा मुलगा अरहानने सुद्धा अर्जुन कपूरला पसंत केले आहे. या दोघांमधील बॉण्डिंग सुद्धा खूप चांगले असल्याचे म्हटले जाते.

मलाइका अरोरा ४५ वर्षांची आहे. तर अर्जुन कपूर तिच्याहून ११ वर्षांनी लहान आहे. काही दिवसांपुर्वी एका मुलाखतीत मलाइकाने तिच्या व अर्जुन च्या लग्नापासून ते त्यांच्या होणाऱ्या मुलाबाबत सांगितले. मलायकाला तिच्या लग्नानंतर मुलांबाबतचा प्रश्न विचारला त्यावर तिने असे उत्तर दिले. मलाइकाने सांगितले, वेळेनुसार आपल्याला एक एक पायरी पुढे गेली पाहिजे. लग्नाबद्दल आत्ताच आम्ही काही सांगू शकत नाही. सर्व गोष्टी वेळेनुसार होत जातील. आम्ही आमच्या रिलेशनशिप बाबत भरपूर इमानदार आहोत. गोष्टी जशा पुढे जात राहतील त्यानुसार आम्ही यावर बोलत जाऊ.

अर्जुन कपूर सोबत लग्न करण्याबाबतीत मलाइकाने सांगितले, जेव्हा मी लग्न करेन तेव्हा ते गपचूप करणार नाही. तुम्हा सर्वांना सांगीन मात्र सध्या तरी आमचा लग्नाचा प्लान नाही. २०१९ मध्ये मलाइकाने तिच्या वाढदिवशी तिचे व अर्जुन कपूरचे रिलेशनशिप सर्वांना सांगितले होते. या नंतर दोघांना सोशल मीडियावर भरपूर ट्रोल केले. अर्जुन आणि मलाइकाच्या वयात भरपूर अंतर आहे. यामुळेच सोशल मीडियावर या दोघांना भरपूर ट्रोल केले जाते. मात्र या गोष्टीचा या दोघांना काहीच फरक पडत नाही.

नोव्हेंबर २०१९ मध्ये मलाइकाने अर्जुन सोबतच्या लग्नाचे प्लॅनिंग शेअर केले होते. नेहा धुपिया च्या शो मध्ये मलाइकाने सांगितलेले की, आमचे लग्न वाईट वेडिंग सेरेमोनी बीच वर होईल. मला ब्राईडमॅड्स ही कन्सेप्ट नेहमीच आवडते. तिथे माझी जवळची गर्लगॅंग असेल. अर्जुन सर्वतोपरी परफेक्ट असल्याचे मलाइका मानते. हे दोघे खूप काळापासून एकमेकांना डेट करत आहे मात्र वर्षापूर्वीच या दोघांनी लोकांसमोर त्यांच्या नात्याला मान्यता दिली.

मलाइका अरोरा चे यापूर्वी अरबाज खान सोबत लग्न झाले होते. त्यानंतर या दोघांचा घ*ट*स्फो*ट झाला. एका इंटरव्यू मध्ये मलाइका अरोरा ने सांगितले की तिला तिच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेम मिळाले आहे. मला असे वाटते की प्रत्येकाने आपल्या आयुष्यात पुढे जावे. आणि जे त्यांच्या सोबत आहेत अशा लोकांचे प्रेमासोबत व त्यांच्यासोबत रहावे. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे करत असाल तर माझ्या दृष्टीने तुम्ही नशीबवान आहात. तुम्ही जर अशाप्रकारे आयुष्य जगात असाल तर तुमचे नशीब तुम्हाला पुन्हा एकदा खुश राहण्याची संधी देईल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !