Headlines

‘मेरे सैंय्या सुपरस्टार’ म्हणत नाचत मंडपात येणाऱ्या नवरीचा व्हिडीओ तुफान व्हायरल, पण कोण आहे ती जाणून घ्या !

लग्न म्हटलं की, नाच, गाणं, धमाल. पण या कोरोनाच्या काळात ना कोणाशी भेट झाली ना मजा मस्ती, ना नाच ना धमाल. सर्वच या कोरोनामुळे भयभीत जीवन जगात होते. पण जस जस हळूहळू आता सर्व गोष्टी पूर्ववत होत आहेत. तशी ज्यांची लग्न या कोरोनामुळे रद्द झालेली ती लग्न सध्या होताना दिसून येत आहेत. कमी माणसांच्या उपस्थितीत का होईना पण ठरलेले समारंभ लोक आटपत आहेत.

हल्ली लग्नामध्ये नवरी मुलगी किंवा नवरा मुलगा मंडपात एन्ट्री घेताना नातेवाईकांकडून नृत्य सादर केलं जात. रिसेप्शनला नवरा नवरी येताना अजून काहीतरी वेगळं नृत्य किंवा काहीतरी युनिक पद्धतीने त्यांची एन्ट्री केली जाते. सध्या या गोष्टी फार मोठ्या प्रमाणात प्रेरक लग्न कार्यात होताना आप्ल्यालाल दिसतात. आपलं लग्न हे प्रत्येक मुलीच स्वप्न असतं. आपल्या सर्व इच्छा, सर्व हौस मौज तिला पूर्ण करायची असते.

लग्नाच्या साड्या, त्यावरचे दागिने, मेकअप, मेहंदी, चपला सगळं काही नवीन आणि सूट होणारं हवं असतं. पण एक गोष्ट आपण सगळेच लहानपणापासून बघत आलो आहोत ती म्हणजे नवरी मुलगी ही नेहमी नाजूक, लाजणारी आणि शांत अशीच आपल्याला सर्व लग्नांमध्ये दिसते. जणू काही गालावर चढली लाजेची लाली असं म्हणत अगदी बावरत येणारी नवरी असते. नवरा मंडपात असताना ४ जणांशी मोकळेपणाने बोलतांना आपण पाहिलंय. पण नवरी मुलगी मात्र शांत एका ठिकाणी बसून असते.

लग्न झाल्यावर नवऱ्याच्या घरी जाताना मुलीने रडलंच पाहिजे, नवरा मुलगा लग्नाच्या वरातीत नाचू शकतो पण नवऱ्या मुलीने नवऱ्याचं उपरणं पकडून चालत राहायचं. आजकालच्या या जगातील नवरी लाजण्या बावरण्यासोबत आपली हौस पूर्ण करण्याला ही तितकंच प्राधान्य देते. कारण लग्न म्हणजे तिच्या आयुष्यातला एकदाच येणारा आनंदाचा क्षण, तो जपण्यासाठी प्रत्येकजण खूप प्रयत्न करत असतो.

याच उदाहरण म्हणजे गेले काही दिवस एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडिओमध्ये नवरी मुलगी नाचत मंडपात एंट्री करत आहे. मराठमोळी साडी, त्यावर सुंदर दागिने घालून आणि उपरणं घेत, डोळ्यांवर गॉगल लावत ‘मेरे सैया सुपरस्टार’ या गाण्यावर नाचत तिने मंडपात एन्ट्री घेतली आहे. ३० नोव्हेंबरला संकेत शिंदे सोबत श्वेता ताजणे हीच लग्न झालं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर अगदी तुफानासारखा व्हायरल झाला आहे.

आतापर्यंत लाखों लोकांनी हा व्हिडीओ पाहीला असून खूप सारे लाईक या व्हिडिओला मिळाले आहेत. लोकांनी या व्हडिओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे, तर काहींनी हा व्हिडीओ रिट्विट देखील केला आहे. हा व्हिडीओ आहे जुन्नर मधील श्वेता ताजणे – शिंदे हिचा. तिचा हा डान्स सर्वांसाठीच अगदी सरप्राईज ठरला. तिच्या नवऱ्याला देखील या तिच्या धमकदार एंट्री बद्दल कल्पना नव्हती.

ती मूळची जुन्नरची आहे परंतु ती कळवा, ठाणे येथे राहते. मनकर फाटा, उदापूर या ठिकाणी त्या दोघांचं लग्न झालं. लग्नामध्ये नाचण्यामागे तीच प्रसिद्धी मिळवणं असं काही उद्दिष्ट नव्हत. फक्त होणाऱ्या नवऱ्याला खुश करण्यामागचा एक हेतू होता, असं ती म्हणाली. तो एक आनंदाचा क्षण होता आणि आयुष्यात लग्न एकदाच होतं, त्यामुळे तिच्या सर्व इच्छा तिला पूर्ण करायच्या होत्या. लग्न म्हणजे आयुष्यातला एकदाच येणारा आनंदाचा क्षण, तो जपण्यासाठी प्रत्येकजण खूप प्रयत्न करत असतो.

नवऱ्याने तर तिचा हा डान्स बघून अक्षरशः तिची दृष्टच काढली. आपल्या इच्छा पूर्ण करत नवऱ्याचं कौतुक करणारी आणि मनमुराद जगणाऱ्या या नवऱ्यामुलीला सलाम आणि या नवदांपत्याला बॉलिरिपोर्ट टीम कडून भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !