Headlines

पोस्टाच्या सुकन्या समृद्धी योजनेत पैसे गुंतवणाऱ्यासाठी महत्वाची बातमी, योजनेत झाले आहेत हे ५ नवीन बदल !

केंद्र सरकारची सुकन्या समृद्धी योजना सर्वसामान्य लोकांमध्ये लोकप्रिय योजना आहे. त्यामुळे यासंबंधित येणाऱ्या कुठल्याही निर्णयांवर सर्वांच्या नजरा खिळून असतात. मुलींसाठी असणाऱ्या सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेत काही बदल करण्यात येणार आहेत. या योजनेचे काही नियम काढून टाकले गेले आहेत.

त्या जागी काही नवीन नियम तयार केले आहेत. हे नवीन नियम अधिसूचित झाले असून या योजना मध्ये कोणते खास बदल झालेले नाही. मात्र जे छोटे छोटे बदल झाले आहेत याबद्दलची माहिती आज आम्ही तुम्हाला या लेखातून येणार आहोत.

१) अकाउंट डिफॉल्ट झाले असले तरीही व्याजदरात बदल होणार नाही – योजने च्या नियमानुसार, योजने मध्ये दरवर्षी कमीत कमी २५० रुपये जमा करणे आवश्यक असते. जर ही रक्कम जमा केली गेली नाही तर त्या खात्याला डिफॉल्ट अकाउंट मानले जाते. नवीन नियमानुसार, जर खात्याला पुन्हा ऍक्टिव्ह केले नाही तर मॅच्युअर होईपर्यंत अकाउंट वर योजना साठी लागू दरानुसार व्याज मिळत राहील. ही खाते धारकांसाठी चांगली बातमी आहे.

जुन्या नियमानुसार, अशा डिफॉल्ट खात्यां वर पोस्ट ऑफिस सेविंग अकाउंट साठी लागू दरातून व्याज मिळायचे. सुकन्या समृद्धि खात्याच्या तुलनेत पोस्ट ऑफिस बचत खात्यांचे व्याजदर खूप कमी आहेत. जिथे पोस्ट ऑफिस च्या बचत खात्यांचे व्याजदर ४ टक्के आहे. तिथे सुकन्या समृद्धी योजनेवर ७.६ टक्के व्याज मिळते.

२) वेळेआधीच खाते बंद करू शकतो – योजनेच्या नवीन नियमानुसार, मुलीचा अकाली मृत्यू झाल्यास किंवा काही कारणास्तव खाते बंद करायचे असल्यास सुकन्या समृद्धी खाते वेळेपूर्वी बंद करण्याची परवानगी दिली गेली आहे. मध्ये खातेदाराच्या एखाद्या गंभीर आजारावर उपचार करणे किंवा पालकांचा मृत्यू यांसारख्या परिस्थितींचा समावेश आहे. मुलीचा अकाली मृत्यू किंवा दुसरा तिच्या राहण्याचा पत्ता बदलणे या दोन कारणांमुळे योजना च्या जुन्या नियमानुसार खाते बंद केले जाऊ शकत होते.

३) दोन हून अधिक मुलींसाठी खाते खोलण्याची चे नियम – या योजना मध्ये दोन मुलींसाठी खाते उघडले जाऊ शकते. मात्र एका मुलीच्या जन्मानंतर जर दोन जुळ्या मुली झाल्या तर आता त्यांचे सुद्धा खाते उघडले जाऊ शकते. या योजना च्या नवीन नियमानुसार जर दोन हून अधिक मुलींसाठी खाते उघडायचे असेल तर त्यांचे जन्म प्रमाणपत्र आणि एफिडेविट जमा करावे लागेल. जुन्या नियमात केवळ पालकाचे मेडिकल सर्टिफिकेट जमा करावे लागायचे.

४) खाते ऑपरेट करण्याचे नियम – नवीन नियमानुसार जर मुलगी १८ वर्षांची नसेल तर तिला खाते ऑपरेट करण्याची परवानगी दिली जाणार नाही. जुन्या नियमात १० वर्षांच्या मुलींना देखील खाते ऑपरेट करण्याची परवानगी होती. नव्या नियमांमध्ये खातेधारक १८ वर्षांची होईपर्यंत तिचे पालक खाते ऑपरेट करू शकतात. मुलगी १८ वर्षांची होईपर्यंत तिचे आवश्यक कागदपत्र जिथे खाते आहे त्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जमा करावेत.

५) हे आहेत अन्य बदल – नवीन नियमानुसार, खात्यात चुकीचे व्याज टाकल्यांनंतर ते परत मिळवण्याची तरतूद काढून टाकण्यात आली आहे. याशिवाय नवीन नियमांतर्गत आर्थिक वर्षाच्या शेवटी खात्यावर व्याज जमा केले जाईल.

खाते उघडण्यासाठी हे कागदपत्र आवश्यक असतात – सुकन्या समृद्धी योजना खाते उघडण्यासाठी चा फॉर्म, मुलीचे जन्म प्रमाणपत्र, जमा कर्त्याचे ओळखपत्र (पॅन कार्ड, रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, पासपोर्ट इत्यादी) जमा कर्त्याच्या पत्त्याचे प्रमाणपत्र जसे की पासपोर्ट, रेशन कार्ड, विजेचे बील, टेलीफोन बील इत्यादी.

पैसे जमा करण्यासाठी तुम्ही नेट बँकिंगचा वापर सुद्धा करू शकता. खाते उघडल्यावर ज्या पोस्टातून किंवा बँकेतून तुम्ही खाते उघडले आहेत ते तुम्हाला पासबुक देतील.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !