Headlines

मच्छर पळवण्याच्या नावाखाली तुम्ही तुमच्या मुलांना विष तर देत नाही ना ? हा लेख वाचा तुमचे डोळे उघडतील !

घर कितीपण अलिशान आणि सोयीसुविधांनी युक्त असलं तरीही घरात शिरणाऱ्या मच्छर प्रचंड त्रासदायक असतात. काही वेळेस या मच्छरमुळे आजारपण येण्याची शक्यता असते. त्यामुळे हे नको असलेले पाहुणे घरातुन घालवण्यासाठी अनेकजण वेगवेगळे उपाय करत असतो. मच्छर घालवण्यासाठी बाजारात अनेक औषधे उपलब्ध आहेत. काही औषधे लिक्वीड स्वरुपात असतात तर काही कॉइल मध्ये छोट्या वड्या येतात.

ही औषधे बाजारात विविध नावाने उपलब्ध आहेत. यांमध्ये एथलीन, मेलफो क्वीन, फोस्टीन यांसारखे केमिकल्स असतात. हे तीनही धोकादायक केमिकल आहेत. विशेष म्हणजे ही मच्छर घालवण्याची औषधे युरोपसह इतर ५६ देशांत गेल्या २० वर्षांपुर्वीच बॅन केली गेली आहेत. आणि आपल्या देशांत लहान मुलांच्या जवळ ते बिंधास्त लावुन फिरतो.

लहान मुलं झोपल्यावर त्यांना मच्छर चावु नये किंवा मच्छरमुळे त्यांची झोप मोड होऊ नये यासाठी आपण ते औषध त्यांच्याजवळ जळवत ठेवतो. जाहिरातींवर विश्वास ठेवुन आपण या औषधांचा वापर करतो खरे पण काही वेळेस ही औषधे माणसाच्या जीवाला धोका सुद्धा बनु शकतात. यामधुन निघणाऱ्या सुगंधी द्रव पदार्थात काही अंशी विष असते. जे हळुहळु आपल्या शरीरात जात असते. काही वेळेस हा सुगंध नाकात गेल्यावर आपल्याला घशात खवखव जाणवते.

एथलीन, मेलफो क्वीन, फोस्टीन हे तीन खतरनाक केमिकल विदेशी कंपन्यांमध्ये बनतात आणि आपल्या देशात विकले जातात. काही स्वदेशी कंपन्या सुद्धा यात सहभागी आहेत. या कंपन्यांमार्फत तयार होणाऱ्या कॉइलमधुन निघणाऱ्या धूरातून विषारी वायु बाहेर पडतो. दोन वर्षांपुर्वी केल्या गेलेल्या एका रिसर्चमध्ये सांगितले होते की, एका कॉईल मधून १०० सिगरेट एवढा धुर बाहेर पडतो. म्हणजे बघा मच्छर घालवणे तुमच्या परिवारासाठी किती धोकदायक असते.

त्यामुळे तुम्हाला मनापासुन विनंती की कृपा करुन असल्या औषधांचा वापर करु नका. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि मग मच्छर कसे घालवायचे?  यासाठीचा सोपा मार्ग म्हणजे मच्छरदाणीचा वापर करा. ती तर स्वदेशीच असते. आणि ती सर्व ठिकाणी उपलब्ध असते. आता तर बाजारात मच्छरदाणीत सुद्धा वेगवेगळे प्रकार येऊ लागले आहे. गोलीकार, झोपतेवेळी अंगार ओढुन झोपण्यासारखी वगैरे वगैरे… याहुन चांगला उपाय म्हणजे बाजारातुन कडूलिंबाचे तेल खरेदी करा.
व त्या तेलाचा दिवा लावा.

यामुळे एकपण मच्छर तुमच्या आजुबाजुस फिरकणार नाही. एक लीटर कडूलिंबाचे तेल साधारण दोन तीन महिने आरामात चालते. यासाठी तुम्ही अजुन एक उपाय करु शकता. गायीच्या शेणापासुन बनलेली धुप किंवा अगरबत्ती लावावी. यामुळे मच्छर पळुन जातात. आजकाल अनेक गोशाळांमध्ये गायीच्या शेणापासुन धुप अगरबत्ती तयार होण्याचे काम चालते.

महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर या धुप-अगरबत्त्या खरेदी केलात तर ते पैसे गोशाळेसाठीच उपयोगी होतील. या पैशांचा वापर गायींच्या पालनपोषणासाठी उपयोगात येईल. तेवढेच तुम्हाला सुद्धा याचे पुण्य लाभेल. व तुमचा पैसा विषारी औषधांच्या पाठी बरबाद होणार नाहीत.

बाजारात मिळणारी ही औषधे भरपूर महाग सुद्धा असतात. १०० -१५० रुपयांना मिळणाऱ्या या औषधांच्या तुलनेत ४० रुपयांपर्यंत मिळणारी गाय़ीच्या शेणापासुन तयार झालेली औषधे कधीही चांगली नाही का ?
अस्वीकारण – वरील सर्व माहिती इंटरनेटच्या आधारे लिहली गेली आहे. गोष्टीची पुष्टी करण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. सोबत माहितीसाठी विडिओ दिलेला आहे बॉलीरिपोर्ट कोणत्याही गोष्टीची पुष्टी करत नाही.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !