Headlines

करोडो रुपयांचे मालक असून देखील ‘अमिताभ बच्चन’ आपल्या वडिलांची ही इच्छा पूर्ण करू शकले नाही !

बॉलिवुडचे म’हा’ना’य’क अशी ख्याती असलेले अमिताभ बच्चन यांनी स्वत:च्या मेहनतीवर इंडस्ट्रीमध्ये स्वत:चे पाय भक्कम रोवले. त्यांनी आजतागायत इतक्या अजरामर कलाकृती मोठ्या पडद्यावर साकारल्या आहेत कि त्यांची आपापसात सुद्धा तुलना होऊ शकत नाही. चित्रपटांशिवाय ते अनेक रियालिटी शों मध्ये सुद्धा काम करतात. सध्या त्यांचा ‘कौन बनेगा करोडपती’ हा रियालिटी शो तुफान गाजत आहे.

बिग बींची लोकप्रियता केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेर सुद्धा खुप आहे. त्यामुळे त्यांना चित्रपटात घेण्यासाठी अनेक निर्माता दिग्दर्शकांची रांग त्याच्याकडे लागलेली असते. बिग बींनी आपल्या चित्रपटात काम करावे यासाठी निर्माते मुबोली रक्क्म त्यांना द्यायला तयार असतात. त्यामुळे त्यांनी इंडस्ट्रीमध्ये काम करुन आजपर्यंत भरपुर पैसे कमावले. या पैशांनी त्यांनी मुंबईतल्या महागड्या ठिकाणी ३ बंगले विकत घेतले. पण तुम्हाला माहित आहे का कि, एवढा पैसा असुन देखील ते त्यांच्या वडीलांची एक इच्छा पुर्ण करु शकले नाही…. ती कोणती ते चला जाणुन घेऊ…

अमिताभ हे त्यांचे वडील हरिवंश राय आणि आई तेजी बच्चन यांच्यासोबत इलाहबादमधल्या एका बंगल्यात भाड्याने रहायचे. १९८४ ला निवडणुकी दरम्यान बिग बींनी तो बंगला खरेदी करण्याची इच्छा बोलुन दाखवली होती. मात्र ही संपत्ती ट्रस्टची असल्यामुळे त्यांची ही इच्छा आजतायागत पुर्ण झालेली नाही.

अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंश राय बच्चन १९३९ मध्ये कटघर मोहल्ले येथे असलेले त्यांचे घर सोडुन क्लाइव रोडच्या बंगल्यात भाड्याने राहयला गेले. या बंगल्यात तीन मोठ्या खोल्या आहेत. यातील एक जास्तच खास होती. त्या खोलीला दरवाजा, खिडकी आणि स्कायलाईट मिळुन एकुण १० इंट्री गेट होते. यामुळे या बंगल्याला १० दारवाला बंगला असे देखील म्हटले जायचे.

मीडिया रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार १९५५ मध्ये हा बंगला इटावा येथील प्रसिद्ध वकील शंकर तिवारी यांनी विकत घेतला होता. ते या बंगल्याच्या रिकामी असलेल्या भगात राहु लागले. तीन वर्षांनी हरिवंश राय बच्चन दिल्लीत राहण्यास गेले. या बंगल्यात अजुन एक भाडोत्री राहयचा त्यांचे नाव टीसी घोष असे होते. त्यांचा आसाममध्ये चहाचा बिझनेस होता. त्यांनी या बंगल्याच्या बाजुला ८ हजार स्केवर फिटचा प्लॉल खरेदी केला आणि तेथे बंगला बनवुन राहु लागले.

नंतर टीसी घोष यांच्या मुलाने तो बंगला केके पांडेय या वकिलांना विकला. आता या बंगल्यात कोणी राहत नाही त्याला टाळे लागले आहे. या बंगल्याची देखभाल ट्रस्टचे सदस्य करतात. स्व र्गी य शंकर तिवारी हे एक नामांकित वकील होते. ते कॉंग्रेस पक्षाकडुन इटावाचे एमपी म्हणुन निवडुन आले होते. सुप्रिमो मुलायम सिंह यांच्या परिवाराशी त्यांचे संबंध खुप चांगले होते. बिगबी सोशल मीडियावरुन अनेकदा त्यांच्या जुन्या आठवणी शेअर करत असतात. एकदा त्यांनी त्यांच्या इलाहबादवाल्या घराचे फोटो सुद्धा शेअर केले होते.

हो फोटो शेअर करताना त्यांनी म्हटले … एके काळी आम्ही या बंगल्याच्या एक चर्तुतांश जागेत राहत होतो. इलाहबाद…१७ क्लाइव रोडमधलं आमचं घर.. यातला एक फोटो १९५० मधला तर दुसरा आहे १९८४ मधला… यांना मी इंस्टाग्रामवर कसं टाकु हे कळत नाही.

अमिताभ बच्चन यांना आज भलेही इलाहबादवाला बंगला मिळाला नसेल पण त्या बंगल्यातल्या आठवणी आजही त्यांच्या मनात ताज्या आहेत. याव्यतिरिक्त आज त्यांच्याकडे मुंबईसारख्या ठिकाणी जलसा, प्रतिक्षा आणि जनक हे तीन बंगले आहेत. २०१७ मध्ये अमिताभ बच्चन यांची नात आराध्या बच्चन तिचे आई-वडील अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्यासोबत तो बंगला पाहण्यास गेली होती.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !