आपले सौंदर्य खुलवण्यात केस विशेष भुमिका बजावतात. लांबसडक, काळेभोर केस असणारी स्त्री नेहमीच आकर्षक दिसते. केस काळेभोर व लांबसडक करण्यासाठी त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. मात्र सध्याच्या धावपळीच्या काळात कामाच्या व्यापात केसांकडे पुरेसे लक्ष द्यायला कोणाला फारसा वेळ नसतो.
त्यामुळे सध्या केसगळती, केसात कोंडा होणे, अवेळी केस पांढरे होणे यांसारख्या समस्या वाढु लागल्या आहेत. अशा वेळी लोक वेगवेगळ्या महागड्या ब्युटी प्रोडक्ट किंवा मेहंदी लावतात. तुम्ही सुद्धा जर केसांना मेहंदी लावत असाल. तर त्यात एक खास गोष्ट मिसळा त्यामुळे तुमचे केस एका आठवड्यात दाट आणि काळेभोर होतील.
ही गोष्ट मिसळा – ज्या दिवशी तुम्ही डोक्याला मेहंदी लावणार असाल त्याच्या आदल्या दिवशी मेहंदी पावडरमध्ये बदामाचे तेल मिसळा. यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात पाणी घेऊन त्यात मेहंदी पावडर मिसळा. त्यानंतर ते भांडे गॅसच्या मंद आचेवर ठेवा. काही वेळा नंतर त्यात बदामाचे तेल घालुन ते मिश्रण चांगले मिक्स करा.
तयार मिश्रण गॅसवरुन उतरवुन थंड करण्यास ठेवा. तयार मिश्रण केसांना लावुन ते सुकवा. सुकल्यानंतर केस चांगले धुवा. असे सलग चार आठवडे केल्यास तुमचे केस मजबूत, दाट आणि काळेभोर होतील. हा उपाय आठवड्यातुन एकदा करावा.
उत्तम केसांसाठी काही टीप्स – केसांना सुंदर बनवण्यासाठी त्यांना तीळ लावा. तीळाच्या सेवनाचे देखील अनेक फायदे असतात. जर तुम्ही तुमच्या जेवणात तीळाचा समावेश केल्यास तुमचे केस दीर्घ काळासाठी काळेभोर आणि घनदाट राहतील. केस धुवताना नेहमी शिकाकाई पावडर किंवा सौम्य शाम्पुचा वापर करावा. केस धुण्यापुर्वी एक कप चहाचे पाणी उकळुन त्यात एक चमचा मीठ घाला. हे मिश्रण केस धुण्यापुर्वी एक तास केसांना लावा. यामुळे केस काळे दिसतील.
आले किसुन त्यात थोडे मध मिसळा व हे मिश्रण डोक्याला लावा. हे उपाय रोज केल्यास पांढरे झालेले केस पुन्हा काळे होण्यास मदत होईल. केसांना मेहंदी लावत असाल तर मेहंदी पावडर भिजवताना ती लोखंडाच्या भांड्यातच भिजवावी. मेहंदी कधीच स्टील किंवा प्लास्टीकच्या भांड्यात भिजवु नये. मेहंदी कधीच केसांना रात्रभर लावुन ठेवु नका. यामुळे केस रुक्ष होतात.
अशाप्रकारे मेहंदी केसांना लावा – सर्वप्रथम केस नीट विंचरुन त्यांचे तीन समान भाग करा. हातात ग्लव्हज् घालून मेहंदीची पेस्ट केसांना लावा. ही पेस्ट केसांच्या मुळापासून ते केसांच्या टोकापर्यंत लागेल याची नीट काळजी घ्या.अशाप्रकारे सर्व केसांना मेहंदी लावून घ्या.
मेहंदी लावून झाल्यावर केसांचा अंबाडा बांधून तो शॉवर कॅपने झाकून घ्या. कमीत कमी दोन ते तीन तास केस तसेच ठेवा. मेहंदी धुतल्यानंतर जेव्हा केस सुकतील तेव्हा केसांना तेलाने मसाज करा. रात्रभर केसांना तेल राहू द्या व सकाळी उठल्यावर केस माइल्ड शाम्पूने स्वच्छ धुवा.
इंडिगो मुळे केस होतात काळे – इंडिगो हे एक झाड आहे. याची पाने सुकवून त्याची पावडर केली जाते. तुमच्या केसांना काळा रंग देण्यासाठी तुम्ही याचा डाळ म्हणून उपयोग करू शकता. हा उपाय पूर्णपणे नैसर्गिक असून त्याने कोणताही अपाय होत नाही. तुम्ही इंडिगो पावडर मेहंदीमध्ये मिसळून केसांना लावू शकता.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !
अस्वीकरण – दिलेल्या टिप्स आणि सूचना सामान्य माहितीसाठी आहेत. त्यांना कोणत्याही डॉक्टर किंवा वैद्यकीय शाश्त्राचा सल्ला असा समजू नका. आजारपण किंवा संसर्गाची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. दिलेल्या माहितीशी बॉलीरिपोर्ट सहमत असेलच असे नाही.