Headlines

या अभिनेत्री आहेत साऊथ फिल्म इंडस्ट्री मधल्या सर्वात तरुण आणि सुंदर अभिनेत्री, नंबर ३ आणि ४ चे फोटोज बघतच राहाल !

चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याचे कोणतेही वय नसते. इथे कुठल्याही वयातील व्यक्ती सहज सामावून जातात. जर या क्षेत्रात नशीब फळफळले तर मग या व्यक्तींना कोणीही मागे खेचू शकत नाही. त्यांना सतत वेगवेगळ्या चित्रपटांच्या ऑफर येत राहतात. मात्र सध्या इंडस्ट्रीमध्ये नव्या टॅलेंटचा नव्या दमाचा शोध घेण्याचा कल अधिक आहे. त्यामुळे चित्रपट तरुणाईवर अवलंबून तयार केले जातात.

साउथ फिल्म इंडस्ट्री मध्ये सुद्धा अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांचे वय खूप कमी आहे. त्यांच्या सफलते बाबत बोलायचे झाल्यास त्या इंडस्ट्रीमध्ये आधीपासूनच अनेक वर्ष काम केलेल्या अभिनेत्रींच्या देखील पुढे आहेत. चला तर जाणून घेऊन कोण आहेत या अभिनेत्री !

1. मालविका शर्मा – अभिनेत्री मालविका शर्मा चा जन्म २६ जानेवारी १९९९ मध्ये झाला होता. मालविका आता २१ वर्षांची आहे. मालविका तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर सतत पोस्ट करत असते. त्यामुळे लोक तिच्या सौंदर्याचे भरपूर कौतुक करत असतात. मालिका आणि रवी तेजा सोबत निला टिकीट या चित्रपटातून पदार्पण केले होते. या चित्रपटात तिची प्रमुख भूमिका होती.

मालविका बद्दल बोलायचे झाल्यास ती एक लॉ स्टुडंट आहे. मात्र तिने तिच्या पहिल्याच चित्रपटात एका मेडिकल स्टूडंट ची भूमिका साकारली होती. हा चित्रपट कल्याण कृष्णा यांनी दिग्दर्शित केला होता तर राम तल्लुरी यांनी निर्मित केला होता.

२०१७ मध्ये कॉलेजमध्ये मॉडेलिंग करतानाच ती ब्लू इंडियाची ब्रँड ॲम्बेसिडर बनली. याव्यतिरिक्त तिने हिमालया, जिओनी, मीरा प्युयर कोकोनट ऑइल, संतूर यांसारख्या जाहिरातींमध्ये काम केले आहे.

2. अनु इम्मानुएल – अनु इम्मानुएल ही साउथ फिल्म इंडस्ट्री मधील सुंदर अभिनेत्री असून तिच्यासमोर अनेक अभिनेत्री फिक्या पडतात. अनु चा जन्म २८ मार्च १९९७ मध्ये झाला होता. ती आता २३ वर्षांची आहे. अनुचा स्वप्न संचारी हा पहिला चित्रपट २०११ मध्ये प्रदर्शित झाला होता.

अनुने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती. तिने अनेक जाहिरातींमध्ये सुद्धा काम केले. २०१६ मध्ये तिने मल्याळम चित्रपटांमधून तिचा डेब्यू केला. २०१७ मध्ये तिने तामिळ चित्रपटांमधून डब्ल्यू केला. यामध्ये तिने सस्पेन्स थ्रिलर अशा एका चित्रपटात काम केले होते.

3. श्रिया शर्मा – अभिनेत्री श्रिया शर्मा चा जन्म ९ सप्टेंबर १९९७ ला झाला होता. श्रिया आता २३ वर्षांची असून तिने अनेक साउथ चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. तिच्या सौंदर्यामुळे तिला अनेक निर्मात्यांच्या चित्रपटांसाठी ‌ऑफर येत असतात. श्रिया चा जन्म हिमाचल प्रदेशात झाला. तिचे वडील इंजिनियर तर आई डायटीशियन आहे.

श्रियाने साउथ इंडस्ट्री सोबतच बॉलिवुडमध्ये देखील अनेक चित्रपटांमध्ये काम केले. तिला २०११ मध्ये नॅशनल फिल्म अवॉर्ड बेस्ट चाइल्ड आर्टिस्ट पुरस्काराने गौरवण्यात आले होते. तिने टीव्ही मालिकांमध्ये देखील काम केले आहे त्यापैकी कसोटी जिंदगी की या मालिकेतील भूमिका तिची फार गाजली.

4. कीर्ती सुरेश – साउथ फिल्म इंडस्ट्री मधील नामांकित आणि सुंदर अभिनेत्री कीर्ती सुरेश चा जन्म १७ ऑक्टोबर १९९२ मध्ये झाला होता. कीर्ती सुरेश आता २८ वर्षांची आहे. तिने ३ वर्षांपूर्वी तिच्या करिअरला सुरुवात केली होती. अगदी कमी वेळातच तिने फिल्म इंडस्ट्री मध्ये भरपूर यश संपादन केले आहे.

कीर्ती निर्माते जी सुरेश कुमार आणि अभिनेत्री मेनका कुमार यांची मुलगी आहे. तिने फॅशन डिझायनिंग मध्ये शिक्षण घेतले आहे. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेला मल्याळम चित्रपट गीतांजलि मधून तिने पहिला मुख्य भूमिकेत काम केले होते. १० ऑगस्ट २०१९ मध्ये तिला ६६ व्या राष्ट्रीय फिल्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !