Headlines

बॉलिवूड मधील ही अभिनेत्री घालते सर्वात महागडे मंगळसूत्र, मंगळसूत्राची किंम्मत बघून थक्क व्हाल !

मंगळसुत्र या शब्दाची फोड करायची झाल्यास मंगळ म्हणजे शुभ आणि सुत्र म्हणजे धागा असा होतो. दोन आत्म्यांना एकत्र आणणारा धागा म्हणजे मंगळ सुत्र असे म्हटल्यास हरकत नाही. आज आम्ही तुम्हाला या लेखा द्वारे ऐश्वर्या राय बच्चन, अनुष्का शर्मा, दीपिका पादुकोण, काजल अग्रवाल, प्रियंका चोपड़ा जोनास, सामंथा अक्किनेनी, शिल्पा शेट्टी कुंद्रा, सोनम कपूर आहूजा या प्रसिद्ध अभिनेत्रींच्या महागड्या मंगळसुत्राबद्दल सांगणार आहोत.

1. ऐश्वर्या राय बच्चन – बॉलिवुडची सर्वात सुंदर अभिनेत्री आणि एके काळची मिस वर्ल्ड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने अभिनेता अभिषेक बच्चन सोबत लग्न केले. आणि बॉलिवुडमधील महत्वाच्या घराण्यांपैकी एक असलेल्या बच्चन कुटुंबाची सुन झाली. ऐश्वर्याने तिच्या लग्नात जे मंगळसुत्र घातलेले त्याची किंमत ४५ लाख रुपये आहे. लग्नामध्ये अभिषेकने ऐश्वर्याला त्रिपल डायमंडचे मंगळसुत्र घातले होते जे ऐश्वर्यावर खुपच सुंदर दिसत होते.

2. दिपिका पादुकोण – बॉलिवुडची सध्याची टॉपची अभिनेत्री म्हणजे दिपिका पादुकोण ने रणवीर सिंहसोबत इटलीमध्ये लग्न केले. दिपिकाच्या मंगळसुत्राबद्दल बोलायचे झाल्यास रणवीरने दिपिकाला एक डिझाइनर मंगळसुत्र घातले होते ज्याची किंमत साधारण २० लाख रुपये होती.

3. अनुष्का शर्मा – भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीने बॉलिवुडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत २०१७ मध्ये लग्न केले. अनुष्काच्या मंगळसुत्रा बद्दल बोलायचे झाल्यास तिने लग्नात घातलेले मंगळसुत्र हे ५२ लाख रुपयांचे होते.

4. शिल्पा शेट्टी – लग्झरी लाईफ आणि शानदार स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असेलली अभिनेत्री शिल्पा शेट्टीने २०१२ मध्ये बिझनेसमन राज कुंद्रा सोबत लग्न केले. शिल्पाच्या मंगळसुत्राबद्दल बोलायचे झाल्यास लग्नात घातलेल्या तिच्या मंगळसुत्राची किंमत ३० लाख रुपये होती.

5. प्रियंका चोपडा – बॉलिवुडची देसी गर्ल अभिनेत्री प्रियंका चोपडाने २०१८ मध्ये अमेरिकन पॉप सिंगर निक जोनस सोबत लग्न केले. लग्नात निकने प्रियंकाला २१ लाख रुपयांचे मंगळसुत्र घातले होते. या व्यतिरिक्त निकने करोडो रुपये किंमत असलेली अंगठी सुद्धा प्रियंकाला घातली होती.

6. सोनम कपुर – फॅशनमुळे सतत चर्चेत असलेली बॉलिवुड अभिनेत्री म्हणजे अनिल कपुरची लेक सोनम कपुर. सोनमने प्रसिद्ध बिझनेसमन आनंद अहुजासोबत लग्न केले. आनंदने सोनमला घातलेल्या मंगळसुत्राची किंमत ५० हजार असल्याचे म्हटले जाते. पण सोनमच्या मंगळसुत्राची विशेष बाब म्हणजे ती मंगळसुत्र गळ्यात नाही तर हातात घालते.

7. माधुरी दिक्षित – ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दिक्षितने १९९९मध्ये डॉ. श्रीराम नेने सोबत लग्न केले. माधुरीच्या मंगळसुत्राबद्दल बोलायचे झाल्यास तिच्या मंगळसुत्राची किंमत ८.५ लाख रुपये होती. एवढेच नव्हे तर ती तिच्या ब्राईडल लुकसाठी सुद्धा चर्चेत होती.

8. काजोल – बॉलिवुड अभिनेता अजय देवगणने अभिनेत्री कोजोलसोबत १९९९ मध्ये लग्न केले. लग्नाच्या वेळी अजयने काजोलला २१ लाख रुपयांचे मंगळसुत्र घातले होते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !