Headlines

१९ वर्षांची मुलगी, ६७ वर्षाचा म्हातारा, पळून जाऊन केलं लव्ह मॅरेज, पण आता झालीय ही अडचण !

लहान आणि मोठ्या वयाच्या व्यक्तींमध्ये प्रेम होणे काही नवी गोष्ट नाही. अशी अनेक उदाहरणे आपण आपल्या आजुबाजुला पाहतो किंवा ऐकतो. साधारण पणे या प्रेमींच्या वयातील अंतर हे दहा ते वीस वर्षे असते. पण आज आम्ही तुम्हाला एक अशी प्रेमकहाणी सांगणार आहोत जिथे या प्रेंमीयुगलांच्या वयातील अंतर तब्बल ४८ वर्षे आहे. या प्रेमींमधील युवतीचे वय १९ वर्षे तर दुसऱ्या व्यक्तीचे वय ६७ वर्षे आहे. एवढेच नव्हे तर त्या व्यक्तीला ७ मुले देखील आहेत. एवढे असुन सुद्धा १९ वर्षांची तरुणी त्या माणसाच्या प्रेमात पडली. विशेष म्हणजे त्या दोघांनी लव्ह मॅरेज सुद्धा केले आहे. मात्र या लग्नामुळे त्यांच्या कुटुंबातील सदस्य खुश नाहीत.

हे अनोखे प्रेमी कपल कोर्टात गेले. हरियाणा कोर्टात या कपलने त्यांच्या जीवाला धोका असल्याचे सांगितले. आमचे कुटुंबीय आमच्या लग्नामुळे खुष नाहीत. ते आम्हाला जी*वे मा*रु इच्छितात. त्यामुळे आम्हाला संरक्षण मिळवुन द्यावे. या कपल मधील ती ६७ वर्षीय व्य़क्ती पलवल जिल्ह्यातील हथीन भागातील हुंचपुरी गांवातील रहिवाशी आहे. तर ती मुलगी नूंह जिल्ह्यातील एका गावातील असल्याचे म्हटले जाते.

सध्या ही अनोखी जोडी पाहुन अनेक जण हैराण होत आहेत. या व्यक्तीने त्याच्या नातीच्या वयातील मुलीशी लग्न का केले, १९ वर्षीय सुंदर युवती त्या ६७ वर्षीय व्यक्तीस कशी पटली असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. त्या मुलीने त्या माणसात असे काय पाहिले जे ती त्याच्यासोबत पळुन जाण्यास तयार झाली.

तर मंडळी, ती १९ वर्षीय युवती आधीपासुन विवाहित होती. मात्र तिला तिच्या पहिल्या लग्नापासुन मुलबाळं कोणीच नव्हते. शिवाय त्या मुलीच्या घरच्यांचा गावात जमीनीवरुन काहीतरी वाद चालु होता. त्यासाठीच त्या ६७ वर्षीय व्यक्तीचे त्या मुलीच्या घरी येणे जाणे होते. तेथेच या दोघांची ओळख झाली आणि ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्या माणसाच्या पत्नीचा काही वर्षांपुर्वीच दे*हां*त झाला होता. तिच्यापासुन त्याला ७ मुले देखील आहेत.

सध्या हे प्रेमीयुगल खुप घाबरले आहे. त्यांच्या घरचे या लग्नामुळे ना खुष नसल्यामुळे ते त्याच्या जीवावर उठले आहेत. त्यामुळे त्यांनी हरियाणा कोर्टात धाव घेतली आहे. व आपल्या सुरक्षेची मागणी ते करत आहेत. डीएसपी हथीन रतनदीप बाली यांनी पोलिसांना या प्रकरणाचा तपास करुन त्यांना सुरक्षा देण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय त्या दोघांनी कोणत्या परिस्थित लग्न केले हे सुद्धा तपासण्यास सांगितले आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !