Headlines

८० एपिसोडसाठी कपिल शर्माने घेतले तब्बल एवढे करोड रुपये, वाचून डोळे पांढरे होतील !

लाफ्टर किंग अशी ओळख असलेला कपिल शर्माचा द कपिल शर्मा शो चा तिसरा सीजन नुकताच संपला. हा तिसऱा सीजनसुद्धा इतर सीजनप्रमाणे तुफान गाजला. या शोमुळे दिवसभराचा थकवा दूर होतो. तसेच काहींच्या म्हणण्यानुसार या शोमुळे लाफ्टर थिएरपी मिळते. तसेच इथे आलेल्या कलाकारांची पोल खोल होते.

त्यामुळे या शो ला प्रेक्षकांकडून खूप प्रसिद्धी मिळाली होती. या शो मधून कपिलने भरपूर पैसेसुद्धा कमावले. सध्या कपिल आणि त्याची संपुर्ण टीम सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी वैकूवर गेले आहेत. सध्या त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

फोटोमध्ये पाहून तरी असे वाटते की सगळेच खूप मस्तीच्या मूडमध्ये आहेत. कपिलनेसुद्धा त्यांच्या मस्तीचे काही क्षण कॅमेऱ्यात कैद करुन त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

टिआरपीच्या स्पर्धेत नेहमी पहिल्या क्रमांकावर असलेला रियालिटी शो कपिलने खूपच छान होस्ट केला होता. आज आम्ही तुम्हाला कपिलने या शो मधून किती पैसे कमावले याची माहिती देणार आहोत.

एका एपिसोडसोठी इतके चार्ज करतो कपिल – सध्या कपिलचे नाव सर्वोत्कृष्ट कॉमेडीयन पैकी एक म्हणून घेतले जाते. पण या सर्व गोष्टी कपिलला सहज मिळालेल्या नाहीत. त्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली आहे. यावेळी द कपिल शर्मा शो च्या तिसऱ्या सीजनमध्ये कपिलने प्रत्येक एपिसोडमध्ये 20 लाख रुपये अधिकचे घेतले होते.

मिळालेल्या महितीनुसार कपिलने पर एपिसोडसाठी 50 लाख रुपये चार्ज केले होते. म्हणजेच प्रत्येक आठवड्याला कपिल 1 करोड रुपये कमवायचा. दुसऱ्या सीजनसाठी त्याने पर एपिसोडसोठी 30 लाख रुपये चार्ज केले होते. यावेळच्या तिसऱ्या सीजनमध्ये 80 एपिसोड होते.

त्यानुसार त्याने यावेळी या शो मधून 40 करोड रुपये कमावले. या शो च्या चाहत्यांना पुढचा सीजन कधी येणार याची उत्सुकता लागली आहे. त्यामुळे लवकरात लवकर हो शो पुन्हा नव्या दिमाखात सगळ्यांना पाहायला मिळेल अशी आशा आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !