Headlines

से’क्सपेक्षाही अशा कोणत्या तीन गोष्टी आहेत ज्या तुला चांगल्या वाटतात ? यावर अभिनेत्री कियारा अडवाणीने दिले हे जबरदस्त उत्तर !

बॉलिवूडमधील स्टार आपल्या चित्रपट आणि अभिनयामुळे कायमच चर्चेत असते. एम. एस. धोनी (दि अनटोल्ड स्टोरी) व कबीर सिंग या चित्रपटातून आपल्याला कियारा दिसली आहे. २०१४ साली फगली या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हिंदी सोबतच तिने तेलगू चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. कियारा अडवाणी सध्या लक्ष्मी या हिंदी चित्रपटाच्या प्रमोशन्स करत असताना दिसत आहे. अक्षय कुमार सोबत कियारा ही लक्ष्मी या आगामी चित्रपटात ती दिसणार आहे.

सध्या लक्ष्मी या हिंदी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तिला विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरावरून ती अगदी चर्चेचा विषय बनली आहे. ट्विक इंडियाने कियाराचं एक व्हिडीओ शेयर केला आहे त्या सेशनमध्ये तिला काही प्रश्न विचारले असता त्या प्रश्नांची अगदी मजेदार अशी उत्तर तिने दिली आहेत.

से’क्सपेक्षाही अशा कोणत्या तीन गोष्टी आहेत ज्या तुला चांगल्या वाटतात? – असा प्रश्न कियाराला विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना कियाराने तिला से’क्सपेक्षाही उत्तम चविष्ट पिझ्झा, खरेदी आणि एक चांगला सिनेमा या तीन गोष्टी जास्त आकर्षित करतात असं म्हणाली. या व्हिडिओमध्ये कियाराने तिच्या आयुष्यातील एक अशी घटना सांगितली आहे ज्यात ती मरता मरता वाचली आहे.

जेव्हा ती ती कॉलेजमध्ये शिकत असताना एकदा मित्र – मैत्रिणीसोबत ट्रीपला गेली होती. तेव्हा तिच्या खोलीत आग लागली होती. त्यावेळेस ती प्रचंड घाबरली होती कारण त्या वेळेस तिचा जीव देखील जाऊ शकला असता.

पुढील प्रश्न तिला विचारला की, तिला किटक किंवा एखादी कीड होण्याची संधी मिळाली तर तिला काय व्हायला आवडेल? या प्रश्नाचं उत्तर देत कियाराने सुरवंट होण्याची इच्छा बोलून दाखवली. जेणेकरून सुरवंटा नंतर ती सुंदर फुलपाखरूही होऊ शकेल.

एका दुसऱ्या मुलाखतीदरम्यान कियारा म्हणाली की, “मी जेव्हा दहावीमध्ये होती तेव्हा मी पहिल्यांदा रिलेशनशिपमध्ये आली आणि त्याच दरम्यान मला आईने फोनवर बोलताना पकडले होते. तेव्हा आई म्हणाली, तुझ्या बोर्डाच्या परीक्षा आता आहेत, तर तू अभ्यास आणि परीक्षांवर तुझं लक्ष केंद्रित कर.

https://www.instagram.com/tv/CHNPDnAI-8e/

कियारा आपल्या आईबाबांबद्दल देखील यादरम्यान बोलताना म्हणाली, “माझ्या आईबाबांचा प्रेमविवाह झाला आहे. दोघे ही भेटण्याआधी त्यांचे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड होते. त्यामुळे घरात फार मोकळं आणि प्रेमळ असं वातावरण आहे. मी ज्या मुलाला डेट करत होती त्याच्यासोबतच माझं लग्न होईल. असा मी विचार करत होते.

कारण प्रेम आणि लग्न या दोन्हीवर माझा विश्वास आहे. अजून एक प्रश्न तिला विचारला गेला तो म्हणजे तू रिलेशनशिपमध्ये कोणतीही गोष्टी सहन करू शकत नाहीस? यावर कियारा म्हणाली, मी रिलेशनशिपमध्ये कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन सहन करू शकत नाही.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !