Headlines

ही दिवाळी म्हणजे ४९९ वर्षानंतर आलेला अद्भुत योग, या राशींच्या लोकांचे चमकेल नशीब !

दिवाळी अगदी तोंडावर वर आली आहे. यावर्षी दिवाळी शनिवारी १४ नोव्हेंबर ला आहे. विशेष म्हणजे दिवाळीच्या शुभ सणाला यावर्षी ग्रहांचा एक अद्भुत योग जुळून आला आहे. कारण या वर्षी दिवाळीला आणि ज्ञानाचे प्रतीक मानले जाणारे धनु आणि शनि त्यांची रास मकर मध्ये राहतील. तर शुक्र ग्रह कन्या राशीत राहील. हा योग ४९९ वर्षांनी आल्याचे ज्योतिषांचे म्हणणे आहे. यापूर्वी ग्रहांची स्थिती १५२१ मध्ये झाली होती.

यावर्षीचा दुसरा मोठा योग म्हणजे दिवाळी आणि नरक चतुर्दशी एकाच दिवशी असेल. नरकचतुर्दशीला छोटी दिवाळी देखील म्हणतात. या दिवशी सकाळी स्नान करून यमतर्पण आणि सायंकाळी दिवे कळवावे. या दिवशी दानधर्म केल्यास पुण्य लाभते.

यावर्षी नरकचतुर्दशीला स्नान करण्याचा शुभमुहूर्त सकाळी ५:२३ ते ६:४३ वाजेपर्यंत आहे. यावेळेस नरकचतुर्दशी दिवाळी प्रमाणे साजरी केली जाईल. चतुर्दशी ही तिथी दुपारी एक वाजून सोळा मिनिटांपर्यंत राहील. यानंतर अमावस्येला प्रारंभ होईल जो १५ नोव्हेंबर सकाळी १० वाजेपर्यंत राहील.

बृहस्पती ज्ञान आणि शनि धनसंपत्ती चे प्रतीक मानले जातात. यावर्षी दिवाळीत गुरु आणि शनि स्वरराशित असल्यामुळे अनेक लोकांना याचा फायदा होऊन त्यांचे भाग्य उजळू शकते. ही दिवाळी अनेक शुभ संकेत घेऊन येणारी असेल. ज्योतिष शास्त्रानुसार हा काळ वृषभ ,कर्क, तूळ आणि कुंभ राशींसाठी शुभ असेल.

यावर्षी ११ नोव्हेंबर पासून १४ नोव्हेंबर पर्यंत सर्वार्थ सिद्धि योग असल्याचे ज्योतिषांचे म्हणणे आहे. दिवाळी, धनत्रयोदशी आणि सर्वार्थ सिद्धि योग असेल तेव्हा खरेदी करणे शुभ ठरेल. खास करून या वेळी वाहन किंवा कुठल्यातरी व्यापारास शुभारंभ करावा कारण हा काळ खास असेल.

दिवाळीच्या दिवशी पवनपुत्र हनुमान, यमराज, चित्रगुप्त, कुबेर, भैरव, कुलदेवता आणि पित्रांची पूजा करायला विसरू नका. देवी लक्ष्मी सोबत भगवान विष्णूची सुद्धा पूजा करावी.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

टीप – भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडीताला विचारावे धन्यवाद.