Headlines

अभिनेत्री जरीन खानच्या व्यायामाचा व्हिडीओ पाहून तुमच्या शरीराचे पाणी पाणी होईल !

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांना त्यांच्या चित्रपटांमधून प्रसिद्धी मिळाली नाही तरी सोशल मीडियावर त्यांची वरील मोठी चाहत्यांची संख्या असते. अशीच एक अभिनेत्री म्हणजे जरीन खान. खरेतर हिला सिनेसृष्टीत फारशी प्रसिद्धी किंवा यश मिळाले नाही. पण सोशल मीडियावर तिचे नाणे खणखणीत चालते.

बॉलिवूड अभिनेत्री स्वताला फिट ठेवण्यासाठी खूप मेहनत घेतात. त्याचप्रमाणे जरीनसुद्धा आपल्या फिटनेससाठी खूप घाम गाळते. तिचे वर्कआउटचे व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात. आता पुन्हा एकदा तिचा वर्कआउट करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला खूप जणांनी लाइक केले.

सलमान खानसोबत आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री जरीन खान सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. तिचे अनेक व्हिडिओ आणि फोटो वेगवेगळे फॅनपेज पोस्ट करत असतात. आता तिने आपल्या अधिकृत इन्स्टा हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला चाहत्यांकडून खूप पसंती मिळाली.

या व्हिडिओमध्ये जरीन योगा रोलरने वेगवेगळे व्यायाम करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये जरीन खान योगा रोलरच्या मदतीने पूर्ण शरीराचा व्यायाम करत आहे. मात्र, हा योगा दिसायला जरी सोपा वाटत असला तरी तितकाच अवघड आहे. झरीन खान व्हिडिओमध्ये मध्येच योगाविषयी बोलताना दिसत आहे. व्हिडिओत जरीन “फक्त गरम पाणी पिऊन वजन का कमी होऊ शकत नाही?” असे विचारताना दिसत आहे. इतकं बोलल्यानंतर ती हसताना दिसते.

त्यानंतर ती म्हणते की “मी काही वेळाने पुन्हा योगा करेन कारण सध्या मला माझ्या शरीरात दुखत आहे”. वर्कआउट करताना अभिनेत्रीने गुलाबी रंगाचा टॉप आणि काळी शॉर्ट्स घातली आहे. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिने केस बांधून ठेवले आहेत. तिचा लूक पाहून चाहते नव्याने पुन्हा तिच्या प्रेमात पडले आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !