Headlines

या कारणामुळे सलमान खानच्या कुटुंबाने अर्पिताला घेतले होते दत्तक, कारण जाणून दंग व्हाल !

बॉलीवूडचा भाईजानला आपल्या कुटुंब व मित्रमंडळींविषयी स्नेह आहे. पण सलमानचे सर्वात जास्त प्रेम हे त्याची बहीण अर्पितावर आहे. बॉलीवूड मधील कोणतेही पार्टी असो व इतर काही समारंभ अर्पिता ही खान परिवारासाठी एक आकर्षण बिंदू ठरते.

परंतु फार कमी जणांना हे माहित आहे की अर्पिताला सलमान खानच्या आईबाबांनी दत्तक घेतले आहे. पूर्ण खान परिवार अर्पिताला आपलंसं मानतात, तिच्यावर सगळेच खूप प्रेम करतात.
1 ऑगस्ट 1989 रोजी अर्पिताचा जन्म मुंबईमध्ये झाला, त्यानंतर तिला सलीम व सलमा खान त्यांनी दत्तक घेतले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सलीम व सलमा खान सकाळी जेव्हा फिरण्यासाठी बाहेर जात असत, तेव्हा रोज फुटपाथवर बसलेल्या गरीब लोकांना ते काही ना काही दान करत असत आणि त्या गरीब लोकांमध्ये एक अर्पिताची आई होती.

जेव्हा ते दोघे रस्त्यावरून जात होते, तेव्हा त्यांनी पाहिलं कि अर्पिताच्या आईने तिला जन्म दिला आहे त्यांना राहवलं नाही आणि ते अर्पिताला घेऊन घरी आले. अशारीतीने अर्पिता खान परिवाराचा एक भाग बनली. काही ठिकाणी असं ही म्हटलं जातं की सलीम खान यांची दुसरी पत्नी हेलन यांनी अर्पिताला द त्त क घेतले होते.
अर्पिता ही फक्त सलमान खानची प्रिय नाही तर पूर्ण खान परिवाराची प्रिय आहे. सलमानची आई सलमा खान देखील आपल्या सख्ख्या मुलीप्रमाणे तिच्यावर प्रेम करते. अर्पिताला 2014 मध्ये आपल्या हाताच्या मनगटावर एक स्टार टॅ टू मिळाला होता.

तिच्या परिवारामध्ये वडील सलीम, आई सलमा, हेलन, भाऊ सलमान, अरबाज, सोहेल आणि बहीण अलवीरा व मैत्रीण दीक्षा हे आहेत. अर्पिता आणि अर्जुन कपूरच्या प्रेम प्रकरणाबद्दल खुलासा हा अर्जुनने बॉलीवूडमध्ये करियरला सुरुवात केली तेव्हा झाला. दोन वर्ष त्यांच्या प्रेम प्रकरणाबद्दल खूप काय बोलणं झालं.

त्यानंतर त्यांच नातं तुटलं, पण त्यामागचं कारण समोर नाही आलं. त्यानंतर अर्पिता दिल्लीमध्ये व्यवसायक आयुष शर्मा याला भेटली. एकमेकांना दोन वर्ष डेट केल्यानंतर लग्न केले. आयुष शर्माचा परिवार हा एक शाही परिवार आहे.
अर्पिताचं लग्न हे बॉलीवूडमधील सर्वात महागडं व राजेशाही लग्नांपैकी एक ठरलं. सलमानचं आपल्या बहिणीवर फार प्रेम आहे आणि तिच्या इच्छेसाठी त्याने तीच लग्न हैदराबादमधल्या फाल्कनुमा पैलेसमध्ये अगदी राजकुमारी प्रमाणे केले.

लाइमलाईटपासून दूर असलेली अर्पिता हिने लंडन कॉलेज ऑफ फॅशनमधून मार्केटिंग आणि मॅनेजमेंटची पदवी घेतली आहे. सध्या ती मुंबईमधील इंटेरीयर डिझाईनिंग कंपनीमध्ये काम करते आहे. अर्पिता भविष्यामध्ये चित्रपट प्रदर्शित करू इच्छिते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !