Headlines

प्रभासने त्याच्या जिम ट्रेनर ला गिफ्ट केली तब्बल एवढ्या लाख रुपयांची लक्झरी कार, किंमत वाचून थक्क व्हाल !

फिल्म इंडस्ट्रीत काम करणारे अनेक कलाकार त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध असतात. एखादा चित्रपट हिट झाला की त्यांच्यामुळे चित्रपटांची रांग लागते. त्यानंतर चित्रपट जाहिरात येईल अशा वेगवेगळ्या माध्यमातून काम करून हे कलाकार भरपूर पैसे कमावतात.

त्यातील काही कलाकार हे आपल्यासाठी मेहनत केलेल्या लोकांची जाण ठेवणारे असतात.आणि कधी ना कधी छोटी-मोठी मदत किंवा त्यांना काहीतरी गिफ्ट देऊन ते त्यांना त्यांच्या सोबत काम केलेल्या मदतीची पावती देतात. अनेक फिल्मस्टार त्यांच्यासोबत काम करणाऱ्या लोकांची खूप काळजी घेतात.

त्यांच्या गरजा त्यांच्या जरूरती या सर्व गोष्टींवर कलाकारांचे लक्ष असते. मग तो त्यांचा बॉडीगार्ड असो किंवा त्यांचा जिम ट्रेनर. असेच काहीसे साऊथचा सुपरस्टार प्रभास ने केले आहे त्यामुळे सगळीकडून प्रभास वर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार बाहुबली फेम प्रभास ने त्याच्या जिम ट्रेनर ला ७३ लाख रुपयांची रेंज रोवर कार गिफ्ट केली.

सोशल मीडियावर सध्या प्रभास चे काही फोटो व्हायरल होत असून त्यामध्ये प्रभासने ही कार गिफ्ट केल्याचे म्हटले जाते. एका फोटोमध्ये प्रभास कार समोर त्याच्या जिम ट्रेनर लक्ष्मण रेड्डी सोबत फोटोसाठी पोज देताना दिसतो. सोशल मीडियावर व्हायरल झालेली ग्रे कलरची कार नुकतीच लॉन्च झाली.
फोटो मध्ये प्रभास, जिम ट्रेनर लक्ष्मण रेड्डी त्यांची पत्नी व मुले दिसत आहेत. प्रभास च्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तो लवकरच आदीपुरुष या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटात प्रभास वाईटाला हरवून चांगल्याला जिंकताना दिसेल.
तानाजी द अनसंग वॉरियर या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांनी हा पण चित्रपट दिग्दर्शित केला आहे.

आदीपुरुष या चित्रपटात प्रभास भगवान श्रीरामाच्या रूपात दिसेल. तर सोबतच अभिनेता सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार सीतेच्या भूमिकेत अभिनेत्री कियारा अडवाणी दिसू शकते. हा चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित होईल.

काही दिवसातच प्रभास अभिनेत्री दीपिका पदुकोण सोबत सुद्धा ओनस्क्रीन दिसणार आहे. तो एक सायन्स फिक्शन थ्रिलर चित्रपट असेल. हा चित्रपट वैजयंती प्रोडक्शन द्वारा बनवला जात असून या चित्रपटाला साऊथ कडील सुप्रसिद्ध दिग्दर्शक नाग अश्विन दिग्दर्शित करत आहेत.

एवढेच नव्हे तर प्रभास राधेश्याम या चित्रपटामध्ये सुद्धा दिसणार आहे तो एक रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे. काही दिवसांपूर्वीच राधेश्याम या चित्रपटाचा फर्स्ट लूक लॉन्च केला गेला. त्या फर्स्ट लुक मध्ये प्रभास अभिनेत्री पूजा हेगडे सोबत रोमँटिक अंदाजात दिसला.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !