फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाव्हायरस ने संपूर्ण जगात हा हा कार मा ज व ला आहे. मार्च महिन्यापासून या व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देश टाळेबंद करण्यात आला. सोबतच सरकारने या व्हायरस पासून वाचण्यासाठी काही नियम व अटी तयार केल्या आहेत यामध्ये मास्कचा वापर अनिवार्य केला.
कोरोनाव्हायरस अधिक तर हवेमार्फत पसरतो त्यामुळे मास्क चा वापर केला नाही तर हा धोका अधिक पटीने वाढण्याची शक्यता आहे असे संशोधनातून समोर आले. यामुळेच सर्वांना मास्कचा वापर करणे सक्तीचे केले आहे. अचानक सर्वांना मास्क लावण्याची सक्ती केल्यामुळे याचे उलटे पडसाद समोर येऊ लागले.
यामध्ये लोकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, डोकेदुखीचे प्रमाण वाढले, गु द म र ल्या सारखे होऊ लागले. मानवी शरीर हे शरीरातील कार्बन-डाय-ऑक्साईड शरीराबाहेर टाकते व वातावरणातील ऑक्सिजन नाका मार्फत शरीरात घेते. मात्र सध्या सतत नाकावर मास्क असल्यामुळे शरीरा बाहेर फेकला जाणारा कार्बन-डाय-ऑक्साईड मास्क मुळे अडून पुन्हा शरीरात जातो.
जे आरोग्यासाठी धोकादायक आहे असे म्हटले जाते. आता या दाव्यामागील सत्य सांगणारे एक संशोधन समोर आले आहे.
अमेरिकेतील मियामी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी या प्रकरणी संशोधन केले.
हे संशोधन अनल्स ऑफ द अमेरिकन थोरॅसिक सोसायटी या जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आले. मास्क लावल्यामुळे शरीरातील कार्बन-डाय-ऑक्साईड पुन्हा शरीरात जाऊन शरीरास त्याचा धोका निर्माण होतो किंवा त्यामुळे द म लागून त्रास होऊ शकतो हे केले जाणारे दावे चुकीचे असल्याचे या संशोधनातून सिद्ध झाले.
या संशोधनात मास्क वापरण्यापूर्वी आणि मास्क वापरल्यानंतरच्या व्यक्तींच्या शरीरातील ऑक्सिजन आणि कार्बन डाय-ऑक्साइड ची पातळी तपासली होती. याशिवाय या संशोधनात निरोगी व्यक्तींसोबत सीओपीडीची समस्या असलेल्या रुग्णांचा अभ्यास केला गेला होता.
या संशोधनाचे विश्लेषण देताना तज्ज्ञ मायकल कॅम्पोस यांनी सांगितले की सीओपीडी च्या रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होतो. त्यांना मास्क लावल्यावर धाप लागू शकते. तसेच फुफ्फुसांची संबंधित आजार असलेल्या रुग्णांवर लावल्याने फार कमी परिणाम दिसून आल्याचे मायकल यांनी सांगितले.
सर्वसाधारणपणे जेव्हा आपण वेगात चालतो किंवा एखादी टेकडी चढतो तेव्हा आपल्याला दम लागतो. त्यामुळे मास्क लावून दम लागल्यामुळे त्याचा जिवाला धोका निर्माण होत नाही. कोरोना पासून बचाव करण्यासाठी मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे.
तुम्हाला जर श्वास घेण्यास अधिकच त्रास होत असेल तर एखाद्या मोकळ्या आणि सुरक्षित ठिकाणी जाऊन काही वेळासाठी मास्क काढण्यास हरकत नाही मात्र गर्दीच्या ठिकाणी तो वापरायला हवा असे मायकल म्हणाले. अमेरिकेतील अटलांटा येथील रोगनियंत्रण व प्रतिबंधक केंद्राच्या आकडेवारीत कोरोना रुग्णांमध्ये जे गंभीर आजारी आहेत ते ९० दिवस या व्हायरसमुळे संक्रमित असल्याचे आढळले.
कोरोना पासून रिकव्हर झालेले लोक १५ मिनिटांमध्ये दुसऱ्या व्यक्तीपर्यंत संसर्ग पसरवू शकतात असे अमेरिकेतील एजन्सीच्या विश्लेषणातून समोर आले. तसेच ९० दिवसा नंतर जर त्या व्यक्तींना कोणता आजार झाला तर तो कोरोना नसल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी आरोग्य कर्मचारी दिवस-रात्र एक करून काम करत आहेत. मात्र त्यांच्या मध्ये RT-PCR पॉझिटिव्ह ची लक्षणे आढळून आली. मात्र त्यांच्यामध्ये प्रतिकारशक्ती देखील असल्याचे सांगितले जात आहे. हा आजार असलेल्या रुग्णांची तपासणी दर आठवड्याला केली जाते.
त्यानंतर अँटीबॉडी च्या पातळीनुसार त्यांना पुन्हा कधी ड्युटीवर रुजू करण्यात यावे हे ठरवले जाते असे केअर हॉस्पिटल चे रोग तज्ज्ञ डॉक्टर मुस्तफा अफझल यांनी सांगितले आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !