Headlines

महाराष्ट्राला ‘वेड्यात’ काढलं जातयं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेबद्दल अक्षय कुमारला जितेंद्र आव्हाडांनी सुनावले !

दिग्दर्शक निर्माता महेश मांजरेकर यांनी काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या आगामी वे़डात मराठे वीर दौडले सात या चित्रपटाची घोषणा केली होती. तेव्हापासून प्रेक्षकांना या चित्रपटात कोणकोणते कलाकार असणार,शिवाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार या सर्व गोष्टींची उत्सुकता लागली होती.

काही दिवसांपूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी या चित्रपटातील कलाकारांची पात्रे आणि ते कोण साकारणार या गोष्टींचा उलगडा केला. त्यावेळी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार असल्याचे समोर आले होते. मांजरेकरांच्या निर्णयाला प्रेक्षकांकडुन समिश्र प्रतिसाद मिळाला.

त्यानंतर अक्षय कुमारने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन आपला शिवाजी महाराजांच्या वेशातील लूक प्रेक्षकांसाठी पोस्ट केला. त्याचा हा लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. हा व्हिडीओ शेअर करत अक्षय कुमारने ‘जय भवानी, जय शिवाजी !’ असे कॅप्शन दिले.

त्याआधी त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोला नमन करतानाचा एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले होते की, आज मी मराठी चित्रपट वेडात मराठे वीर दौडले सातच्या शूटिंगला सुरुवात करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. मी त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन तसेच माता जिजाऊंच्या आशिर्वादाने माझा संपूर्ण प्रवास करीन. आशीर्वाद असू द्या.

अक्षयचा शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर आल्यावर अनेकांकडून नाराजीचे सूर उमटलेले पाहायला मिळत आहेत. शिवाय काही युजर्सनी तर त्यामधून काही चुकाही शोधल्या आहेत. एका युजरने म्हटले की ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७४ ते १६८० या काळात साम्राज्य केलं. थॉमस एडिसनने १८८० मध्ये बल्बचा शोध लावला, मग हे कसं काय?’

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही सिनेमावर टीका केली आहे. आव्हाड यांनी एक ट्वीट शेअर करत म्हटलंय की ‘जर्मनी, पॅरिस, अमेरिका येथे संग्रहालयात असलेली ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिवकालीन चित्र आहेत. त्यावरुन शिवाजी महाराजांची साधारणत: आपल्याला कल्पना येते. चित्रपट येतोय- ‘वेडात मराठे वीर दौडले सात’. त्यामधील शिवाजी महाराज बघितल्यावर महाराष्ट्राला ‘वेड्यात’ काढलं जातयं असं वाटतं.’ आव्हाड यांनी अक्षय कुमारचं नाव न घेता त्याच्या लूकवर केलेली ही टिप्पणी चर्चेत आली आहे.

तर काहींच्या म्हणण्यानुसार शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराद्य दैवत आहेत. त्यांची भूमिका साकारण्यासाठी अनेक सर्वौत्कृष्ट कलाकार आहेत. असे असून देखील अक्षय कुमारला घेण्याची गरज काय. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटात बिग बॉस ३ मराठी विजेता विशाल निकम हा चंद्राजी कोठार यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)


तर महाराष्ट्राचा लाडका राणादा अर्थात हार्दिक जोशी हा मल्हारी लोखंडे यांची भूमिका निभावणार आहे. विराट मडके जिवाजी पाटलांची, सत्य मांजरेकर दत्ताजी पागे यांची, प्रसिद्ध गायक डॉ. उत्कर्ष शिंदे सूर्याजी दांडकर, जय दुधाणे तुळजा जामकर आणि अभिनेते प्रवीण तरडे हे प्रतापराव गुजर यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.

या चित्रपटातून अक्षय मराठीत पदार्पण करणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकताही पाहायला मिळते. हा चित्रपट 2023 मध्ये दिवाळीत प्रदर्शित होणार असल्याचे बोलले जाते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !