Headlines

मृत्यूनंतर इतक्या करोडची संपत्ती मागे सोडून गेले अभिनेते ‘जय प्रकाश रेड्डी’, जाणून चकित व्हाल !

साउथ कडील सुपरस्टार जय प्रकाश रेड्डी यांना आपण साउथ चित्रपटांमध्ये विनोदी कलाकार किंवा कधीकधी खलनायक म्हणून पाहिले आहे. प्रेक्षकांना हसवणारा तर कधी घाबरयला लावणारा हा व्हिलन मंगळवारी आपल्याला सोडून गेला. जय प्रकाश रेड्डी यांचे ८ सप्टेंबर २०२० ला हृ दय वि का रा च्या झ ट क्या ने नि ध न झाले.
जय प्रकाश रेड्डी यांचे खरे नाव तुर्पू जय प्रकाश रेड्डी असे होते. त्यांना जे पी म्हणून लोक हाक मारायचे. जयप्रकाश यांचा जन्म १० ऑक्टोबर १९४५ रोजी आंध्र प्रदेश मध्ये झाला. वयाच्या ७४ व्या वर्षी गुंटूर आंध्र प्रदेश मध्ये त्यांचे नि ध न झाले.
जयप्रकाश रेड्डी यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात १९८८ मध्ये आलेला तेलगू चित्रपट ब्राम्हा पुत्रुडू मधून केली होती. या चित्रपटामध्ये त्यांनी पोलिसांची भूमिका साकारली होती.
या चित्रपटानंतर दोन वर्षे जयप्रकाश यांच्या हाती कोणतेच काम मिळाले नाही‌. त्यानंतर १९९० मध्ये त्यांनी सलग शत्रुवू , लॉरी ड्रायव्हर, आणि बबलू राजा या तीन चित्रपटांमध्ये काम केले. यानंतर सुद्धा त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले मात्र त्यांना खास ओळख निर्माण करता आली नाही. त्यानंतर १९९९ मध्ये समारासिम्हा रेडी हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि रातोरात त्यांची ओळख जगाला समजली. या चित्रपटानंतर त्यांच्या करिअरची गाडी सुसाट सुटली व एकापाठोपाठ एक चित्रपट करून प्रेक्षकांच्या मनात त्यांनी स्वतःचे स्थान पक्के केले.
छत्रपती, निजाम, आरु, चिन्हा, रेडी, किंग, बिंदास गब्बर सिंग, मनम, टेम्पर, लव्हर, नेला टिकट यांसारख्या चित्रपटांमध्ये जयप्रकाश यांनी काम केले. तेलगू चित्रपटां व्यतिरिक्त त्यांनी तमिळ कन्नड चित्रपटांमध्ये देखील काम केले. जयप्रकाश रेड्डी यांचा शेवटचा चित्रपट महेश बाबू यांच्या सोबतचा ठरला. तो चित्रपट याच वर्षी जानेवारी महिन्यात प्रदर्शित झाला होता.
प्रकाश रेड्डी यांचे घर हैदराबाद मध्ये होते तेथे त्यांच्या कुटुंबासोबत राहायचे. त्यांच्याकडे ऑडी आर ८, आणि ऑडी क्यू ७,  ३५ लाखांची टोयोटा फॉर्च्यूनर यांसारख्या वेगवेगळ्या महागड्या गाड्या होत्या. जय प्रकाश रेड्डी एका चित्रपटात अभिनय करण्यासाठी ८० ते ९० लाख रुपये फी घ्यायचे. द टॉप एव्हरीथिंग या युट्युब चॅनेल आणि ट्रेंडसेलेब्सनाऊ.कॉम या संकेतस्थळाच्या माहितीनुसार त्यांची निव्वळ संपत्ती १ मिलियन ते ५ मिलियन डॉलर इतकी आहे.
जय प्रकाश रेड्डी यांच्या अचानक जाण्याने सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या नि ध ना नंतर एन चंद्रबाबू नायडू यांनी ट्विट केले की जय प्रकाश रेड्डी यांच्या नि ध ना ने तेलगू चित्रपट सृष्टीने आज एक अनमोल रत्न गमावले आहे. तर बॉलिवूड अभिनेत्री जेनेलिया डिसूझाने ट्विट केले, जय प्रकाश रेड्डी गुरु श्र द्धां ज ली. हे तेलुगु फिल्म इंडस्ट्री मधील एक उत्कृष्ट विनोदी कलाकार होते. त्यांच्यासोबत काम केल्याच्या आठवणी माझ्या नेहमी स्मरणात राहतील.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !