Headlines

यापूर्वी तू चित्रपटात किस्सिंग सीन दिला आहे मग यावेळी तुला काय अडचण आहे, या प्रश्नावर अभिनेत्रीने दिले हे उत्तर, जाणून घ्या !

कास्टिंग काउच ही फिल्म आणि टीव्ही इंडस्ट्री ची काळी बाजू आहे. इंडस्ट्रीमधील काही कलाकार कास्टिंग काऊच सारख्या प्रकरणावर गप्प बसतात. तर काही कलाकार याप्रकरणी आवाज उठवतात. नुकतेच काही दिवसांपूर्वी अभिनेत्री समीरा रेड्डी ने करिअरच्या सुरुवातीच्या दिवसात कास्टिंग काउच आणि नेपोटिझम सारखे प्रकार तिच्या सोबत घडल्याचे सांगितले.
समीराने सांगितले की तिच्याकडे अप्रत्यक्षरीत्या से क्शु अ ल फेवर मागितले गेले होते. एकदा चित्रपट निर्मात्याने ही मागणी केली तर दुसऱ्यांदा एका चित्रपटातील हिरो ने मागणी केली होती. या दोघांनीही अप्रत्यक्षरित्या समीरा सोबत शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता.

तिच्यासोबत घडलेल्या पहिल्या घटने विषयी सांगताना समीरा म्हणाली, ती एक चित्रपट करत होती आणि अचानक तिला सांगितले गेले की या चित्रपटामध्ये एक किसिंग सीन जोडला आहे. याआधी चित्रपटाच्या स्क्रिप्टमध्ये तो सीन नव्हता त्यामुळे समीरा तो सीन करण्यास तयार नव्हती.
याआधी समीराने मुसाफिर या चित्रपटामध्ये एक किसिंग सीन केला होता त्यामुळे चित्रपट निर्मात्याने तु त्या चित्रपटातही किसिंग सीन दिला होता मग इथे पण दे असे बोलून तिच्याकडून तो सीन करून घेण्याचा प्रयत्न केला. यावर समीराने उत्तर दिले की मी तिथे तो सीन केला होता याचा अर्थ मी इथे सुद्धा करावा असं नाही. समीराच्या अशा बोलण्यानंतर तिला त्या चित्रपटामधून काढण्यात आले.
तसेच दुसरी घटना सांगताना समीरा म्हणाली, एका अभिनेत्याने तिच्यावर कमेंट केली होती की तू खूप अनअप्रोचेबल आहेस. त्या अभिनेत्याने समीराला बोरिंग म्हणून तुझ्यासोबत मजा येत नाही असे म्हटले. पुढे त्या अभिनेत्याने सांगितले की मी पुन्हा तुझ्यासोबत काम करू इच्छित नाही.

त्या चित्रपटानंतर समीराने सुद्धा त्या अभिनेत्यासोबत कधीच काम केले नाही. समीरा पुढे म्हणाले की, तिला तीन चित्रपटांमधून रिप्लेस केले आहे. त्यावेळी तिला त्या चित्रपटांमधून रिप्लेस करण्याचे कारण देखील सांगितले नव्हते.
एकदा तिला एका स्टार कीड साठी बदलले होते. आणि दुसऱ्या वेळेस त्या चित्रपटातील हिरो दुसऱ्या अभिनेत्रीसोबत जास्त फ्रेंडली होता त्यामुळे बदलले होते. समीर आणि सांगितले की तिने एकदा एक चित्रपट साईन केला होता त्यानंतर अचानक चित्रपट निर्मात्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावून ती आता या चित्रपटाचा हिस्सा नाही असे सांगितले.
त्यावेळी तिला खूप वाईट वाटल्याचे समीराने सांगितले. सुरुवातीला ती चित्रपटातून काढण्याबाबत स्वतःला दोष देत होती मात्र नंतर तिला कोणीतरी सांगितले की तुला एका स्टार किडसाठी रिप्लेस केले आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !