सोशल मीडिया क्वीन उर्फी जावेद तिच्या युनिक फॅशन सेन्ससाठी प्रसिद्ध आहे. उर्फीच्या फॅशनमूळे ती नेहमीच चर्चेत असते. उर्फी वायर, सेफ्टी पिन, घड्याळ, फुलं याने तयार डिझाईन केलेले ड्रेस घालत असते या युनिकनेसमुळे ती नेहमीच चर्चेचा विषय बनलेली असते. आता उर्फीने एक नवीन लूक शेअर केला आहे ज्यात तिने बोल्डनेसची हद्द पार केली आहे. हे फोटो उर्फीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
उर्फी जावेदचा ग्लास लूक – उर्फी जावेदने इंस्टाग्रामवर नवीन फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिने फक्त समोर काच पकडली आहे ज्यात फक्त महत्वाचे पार्ट झाकले आहेत. या पोस्टमध्ये तिने कधी पाऊट केला आहे तर कधी वेगवेगळे नखरे करताना ती दिसत आहे.
उर्फीने या पोस्ट खाली ‘मुझे नही पता हे, मुझे मत पूछो ना’ असे कॅप्शन दिले आहे. उर्फीचा हा लूक पाहून कोणीही बुचकळ्यात पडेल तिने अंगावर रंग लावला आहे की….. पण खरं तर तिने हातात एक काच पकडली आहे आणि त्यावर रंग दिला आहे.
View this post on Instagram
सोशल मीडिया हदरला – उर्फीचा हा लूक पाहून सोशल मीडिया युजर्स हदरले आहेत. यासोबतच तिच्या फॅन्सना हा लूक खूपच आवडत आहे. पोस्ट केल्या केल्या लगेचच या पोस्टला मोठ्या प्रमाणात लाईक्स आल्या तेवढ्याच कमेंट्स देखील या पोस्टवर येत आहेत.
कमेंट बॉक्समध्ये तिचे फॅन्स तिचे कौतुक करत आहेत. पॉसिटीव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही प्रकारच्या कमेंट यावर केल्या जात आहेत पण उर्फीवर याचा काहीच परिणाम होत नाही. तिच्या प्रत्येक लुकसाठी तिला ट्रोल केले जाते. सोशल मीडियावर तर उर्फीचे फोटो नेहमीच वायरल होताना आपल्याला दिसतात.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !