Headlines

भर कार्यक्रमात ‘नेहा कक्कड’ला किस करणाऱ्या व्यक्तीचे पुढे काय झाले ? जाणून चकित व्हाल !

बॉलिवुड इंडस्ट्री मध्ये अनेक गायक आहे, ज्यांनी त्यांच्या आवाजाची भुरळ संपूर्ण जगाला घातली आहे. संगीत हा चित्रपटाचा पाया असतो. चित्रपटामध्ये संगीत किंवा गाणे नसेल तर तो चित्रपट निर्जीव वाटतो. त्यामुळे चित्रपटांमध्ये गाण्याला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते.

काही वेळेस तर चित्रपटांमधील गाण्यांमुळे चित्रपट जास्त प्रसिद्ध होतात. सध्याचा जमाना हा उडत्या गाण्यांचा आहे. तरुणाईलाही गाणी खूप आवडतात त्यामुळे सध्याच्या नव्या फळीच्या गायकांचा कल हा अशी गाणी गाण्यास जास्त असतो. यामध्ये बॉलीवूड ची सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कड सध्या बॉलिवूडमध्ये टॉपची गायिक म्हणून ओळखली जाते. सध्या बॉलीवूड मध्ये नेहाच्या आवाजाचा चाहाता वर्ग खूप मोठा आहे.

बॉलीवूड चे टॉप ची गायिका नेहा कक्कड चा आवाज खूपच गोड आणि सुरेल आहे. तिने आयुष्यात खूप मेहनत करून बॉलीवूड मध्ये स्वतःच्या आवाजाची ओळख निर्माण केली. कित्येक वर्षांच्या अथक प्रयत्नांनी ती आता एक गायिका म्हणून स्वतःचे करिअर निभावत आहे.

सर्वसामान्य आयुष्यापासून ते एक सेलिब्रिटी गायिका पर्यंतच्या प्रवासात तिला नाव व प्रसिद्धी मोठ्या प्रमाणात मिळाली. बॉलीवूड मध्ये तिची बरीच गाणी सुपरहिट झाली आहे. २००६ मधील इंडियन आयडल सीजन २ या शोमधून प्रवास सुरू झाला. ती या शोमध्ये त्यावेळी स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. मधल्या काही वर्षांमध्ये नेहाची सन्नी सन्नी, मनाली ट्रांस, आओ राजा, धतींग नाच, लंडन ठूमकदा, जादू की झप्पी आणि दिलबर यांसारखी अनेक गाणी सुपरहिट ठरली. नेहाचा भाऊ टोनी कक्कड सुद्धा बॉलीवूडमध्ये संगीतकार आहे.

इंडियन आयडल सीजन ११ चा प्रमोद लॉन्च झाल्यापासूनच हा शो सोशल मीडियावर चर्चेला आला होता. या शोमध्ये नेहा परीक्षक म्हणून काम पाहत होती. या शोचे बरेच व्हिडिओ वायरल झाले होते. त्यातील एका क्लिप मध्ये या शोमधील एक स्पर्धक भर मंचावर नेहा कक्कड ला गालावर किस करण्याचा प्रयत्न करताना दिसला. या घटनेनंतर त्या मुलाचे काय झाले हे आज आम्ही तुम्हाला या पोस्ट मार्फत सांगणार आहोत.

नेहा कक्कड ने इंडियन आयडल सीजन ११ मध्ये विशाल ददलानी आणि अनु मलिक सोबत परिक्षकाचे काम पाहिले. काही दिवसांपूर्वी या शोमध्ये राजस्थानी वेशभूषेत एक स्पर्धक स्टेजवर आला आणि त्याने नेहा कक्कड ला भेटण्याची इच्छा व्यक्त केली.
नेहा जशी त्याला भेटण्यासाठी स्टेजवर गेली तसे त्या स्पर्धकाने नेहाला मिठी मारली व तिच्या गालावर किस करण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार पाहून या शो मधील इतर परीक्षक विशाल ददलानी आणि अनु मलिक अवाक झाले. सोशल मीडियावर सुद्धा या प्रकारा विरुद्ध अनेकांनी स्वतःची मते नोंदवली. तुमच्या डोळ्यादेखत असे कसे घडू शकते असा जाब लोक विशाल ददलानी ला विचारू लागले.

एवढेच नव्हे तर एका युजरने लिहिले की त्या स्पर्धकाला जोरदार का ना खा ली मारली पाहिजे होती. त्याची असे करण्याची हिंमतच कशी झाली. यावर विशाल ददलानी ने उत्तर दिले कि, हा प्रकार घडल्यानंतर आम्ही पोलिसांना बोलावण्याचा निर्णय घेतला होता. आम्ही पोलिसांना बोलणार इतक्यात नेहाने त्याला पोलिसांकडे सोपवण्यास नकार दिला.

नेहाने आम्हाला सांगितले की पोलिसांनी ऐवजी त्याला आपण मनोवैज्ञानिकाकडे घेऊन जाऊ. त्याला योग्य त्या उपचारांची गरज आहे. नेहाला किस करणाऱ्या त्या व्यक्तीचे नाव मिलन राजपूत होते. त्याने नेहा साठी भरपूर भेटवस्तू आणल्या होत्या.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !