Headlines

आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाच्या निवृत्ती अखेर ‘महेंद्रसिंग धोनी’ आहे तब्बल एवढ्या संपत्तीचा मालक !

क्रिकेट विश्वातील निराशाजनक बातमी नुकतीच समोर ती म्हणजे भारताचा सुपर कूल माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनीने त्याची निवृत्ती जाहीर केली. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एम एस धोनी जगभरातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटर्स पैकी एक आहे. धोनीने मागील १५ वर्षात त्याच्या करिअरमध्ये अनेक टप्पे गाठले. क्रिकेट खेळाच्या इतिहासात ५० ओव्हरचा विश्व कप, टी२० विश्व कप आणि सोबतच चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा धोनी हा पहिला कॅप्टन आहे. क्रिकेटच्या मैदानावर धोनीचा वावर पहायला सर्वांनाच आवडते. झारखंड मधील हा क्रिकेटर मोठमोठ्या सामन्यांना स्वतःच्या नावावर करण्यात यशस्वी ठरला आहे.
धोनीला सर्वाधिक व्यस्त क्रिकेटर पैकी एक मानले जाते. धोनी सगळ्या ट्रेंड्स चा मास्टर आहे. धोनीचा शानदार शॉट्स असो, त्याचे शांत राहणे असो, सामन्याची उत्कृष्ट पद्धतीने फिनिशिंग करणे असो किंवा त्याचे अभिनयकौशल्य असो तो सर्वच बाबतीत उजवा ठरतो. धोनीने आतापर्यंत त्याच्या करिअरमध्ये एकूण भरपूर कमाई केली. त्याची सर्व कमाई ऐकून तुम्ही हैराण व्हाल.

एम एस धोनी ने आत्तापर्यंत पद्मश्री, राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार, आणि पद्मभूषण यांसारखे अनेक प्रतिष्ठित पुरस्कार जिंकले आहे. याव्यतिरिक्त धोनी भारतीय सेनेत मानद लेफ्टनंट कर्नल या रॅंकवर आहे. २०११ मध्ये धोनीला मोंटफोर्ट विश्वविद्यालयात द्वारे डॉक्टरेटच्या पदवीने सन्मानित केले. आतापर्यंतची कॅप्टन धोनी ची सर्व कामगिरी पाहता त्याचे क्रिकेट करियर, जाहिराती आणि अन्य व्यवसायिक संघाद्वारे त्याने १५० मिलियन हून अधिक कमाई केल्याचे पिंकविला चे म्हणणे आहे.
एम एस धोनी रांची मधील हॉकी क्लब रांची रेंजचा सहमालक आहे तसेच चेन्नईतील फुटबॉल क्लब चेन्नई एफसीचा तो मालक आहे. तेलुगु फिल्म स्टार अक्किनेनी नागार्जुन सोबत भागीदारीमध्ये धोनीने माही रेसिंग टीम इंडिया नावाची सुपरस्पोर्ट वर्ल्ड चॅम्पियनशिप टीम खरेदी केली. याव्यतिरिक्त तो झारखंड मधील हॉटेल माही रेसिडेन्सी चा मालक आहे. तसेच त्याच्या स्पोर्ट्स फिट नावाच्या अनेक जीम सुद्धा आहेत.
माही बाईक्सचा किती शौकीन आहे हे सर्वांनाच माहिती आहे. आतापर्यंत त्याने वेगवेगळ्या आधुनिक बाईकचा संग्रह केला आहे. तो सुझुकी शोगुन पासून कावासाकी निंजा एच २ यांसारख्या महागड्या गाड्यांचा मालक आहे. रांची मधील त्याच्या फार्म हाऊस वर बाईक्स संग्रहित करून ठेवण्यासाठी त्याने एक विशिष्ट गॅरेज तयार केले आहे. या सर्वां सोबतच धोनी एक व्यावसायिक असण्यासोबत वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये पुढे जात आहे.
महेंद्रसिंग धोनी एवढ्या सर्व संपत्तीचा मालक असूनही मध्यंतरी पुण्यातील दिहाडी मजुरांना धोनीने एक लाख रुपये दान केल्याची खबर आली होती. त्यानंतर सोशल मीडियावर त्याच्याविरोधात खूप नाराजी व्यक्त केली गेली. धोनीच्या चाहत्यांनी त्यावेळी धोनीला ट्रोल केले की, ८०० करोडो रुपयांची संपत्ती असूनही धोनीने फक्त एक लाख रुपयांची मदत करणे खूप दुःखद आहे. त्यावेळी सचिन तेंडुलकरने महाराष्ट्र सरकार आणि प्रधानमंत्री राहत कोशात प्रत्येकी २५ लाख रुपये दान केले होते. धोनीच्या या मदतीला जेव्हा त्याचे चाहाते नाराज झाले त्यावेळी धोनीची पत्नी साक्षी समोर आली आणि या सर्व अफवा असल्याचे तिने सांगितले.
महेंद्रसिंग धोनीच्या क्राउड फंडिंग वेबसाइट मार्फत मुकुल माधव फाउंडेशन पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टला हे पैसे दान केले होते. या पैशांचा उपयोग पुण्याच्या दिहाडी मजुरांच्या परिवारासाठी राशन सामान देण्यासाठी केला. धोनीची पत्नी साक्षी धोनी ने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर यासंबंधीची लिंक शेअर केली होती. धोनीने पुढाकार घेतल्यानंतर मदतीसाठी अजून काही लोक पुढे आले होते त्यानंतर बारा लाख रुपये जमा केले गेले. त्यावेळी धोनीने पुण्यातीलच मजुरांना दान का केले हा प्रश्न लोकांच्या मनात येत होता. यामागील खरे उत्तर म्हणजे धोनी आयपीएल च्या २०१६ आणि २०१७ मध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्सचा भाग होता. त्यावेळी दोन वर्षासाठी चेन्नई सुपर किंग्स वर बॅन लावले होते.
२०१६ मध्ये धोनीने पुण्याची कॅप्टनशिप स्वीकारली होती तर त्याच्या पुढील सीझनमध्ये तो स्टीव स्मिथच्या कॅप्टन शिप खाली खेळला होता. टीम इंडियाचा पूर्व कॅप्टन सचिन तेंडुलकरने सुद्धा कोरोनाव्हायरस पीडितांसाठी मदत केली होती. सचिन तेंडुलकर ने तेव्हा ५० लाख रुपये दान केले होते. याशिवाय सौरव गांगुली, इरफान आणि युसुफ पठाण यांनी सुद्धा गरजू लोकांना मास्क वाटले होते.