Headlines

सैफ अली खानच्या ५००० करोड रुपयाच्या संपत्ती मधील एक फुटकी कवडी पण तैमूरला भेटणार नाही, जाणून घ्या कारण !

‘हम साथ साथ है’ या चित्रपटांमधून बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण करणारा अभिनेता म्हणजे सैफ अली खान. बॉलिवूडमधील प्रसिद्ध, लोकप्रिय व जुन्या अभिनेत्यांपैकी एक सैफ अली खान होय. अनेक गाजलेल्या हिंदी चित्रपटांमध्ये सैफ अली खानने काम करत अनेक वर्ष रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. सध्या सैफ अली खान सॅक्रेड गेम्स, तांडव यासारख्या प्रसिद्ध वेब सिरीजमध्ये देखील सैफ अली खानने आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे.

तांडव या वेब सिरीज नंतर सैफ अली खान वादविवादामध्ये अडकला होता. या वेबसिरीजवर अनेकांचं असं मत होतं की, एका जातीविषयक मुद्द्याला यामध्ये लक्ष्य केलं जात आहे व सोबतच यामध्ये धर्माला देखील कमीपणाची भावना देऊन दर्शवलं जातं आहे. हा वादविवाद आता कोर्टामध्ये जाऊन पोहचला आहे.

अभिनय क्षेत्रातील या वादविवादांव्यतिरिक्त खाजगी जीवनातील अनेक वादविवादांच्या गराड्यात सैफ अली खान अडकतो. सैफ अली खान हा शर्मिला टागोर व प्रसिद्ध क्रिकेटर मन्सूद अली खान यांचा मुलगा आहे. तो या पतौडी घराण्याचा १० नवाब असून भोपाळ मध्ये त्यांची एक भलीमोठी परंपरागत चालत आलेली हवेली आहे. या पतौडी घराण्याची करोडो रुपयांमध्ये संपत्ती आहे. या करोडोंच्या संपत्तीवर एकट्या सैफ अली खानचा पूर्णपणे अधिकार आहे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्याच्या या संपत्तीमधून त्याचा मुलगा तैमूर अली खान याला काहीच भाग मिळणार नाही आहे. या गोष्टीवरून देखील सैफ अली खान वादामध्ये अडकला की, त्यांच्या संपत्तीमधून तैमूरला काहीच संपत्तीचा भाग का नाही मिळणार….

सैफ अली खान हा नवाब घराण्याचा असून भोपाळ व्यतिरिक्त त्यांची संपत्ती इतर देखील ठिकाणी पसरलेली आहे. भोपाळमधील सैफ अली खानची संपत्ती ही जवळजवळ ५००० करोडपेक्षा देखील जास्त आहे आणि या किमतीमुळेच ही संपत्ती विवादाचा भाग ठरली आहे. या संपत्तीचा पूर्ण मालकीहक्क हा सैफ अली खानचे पणजोबा आणि भोपाळ जहागिरीचे शेवटचे नवाब हमीदुल्ला खान यांच्याकडे होता. त्यांनतर हि संपत्ती डिसेंबर २०१६ नंतर एनिमी प्रॉपर्टी एक्ट अंतर्गत आली.

यामध्ये त्यांच्या संपूर्ण संपत्तीचा समावेश असून या संपत्तीची पडताळणी एनिमी प्रॉपर्टी विभाग करत आहे. सैफ अली खानचा मुलगा तैमूर अली खान याच्या जन्मानंतर ही पतौडी घराण्याची ५००० करोडपेक्षा अधिक असलेली संपत्ती त्याच्या नावे होईल. पण ही संपत्ती जर एनिमी प्रॉपर्टी म्हणून गणली जात असेल तर या संपत्तीचा कोणताच भाग तैमूर अली खानच्या नवे होऊ शकणार नाही. परंतु या विषयी अद्याप पडताळणी सुरु आहे. सरकारदेखील या मुद्द्यावर पूर्णपणे पडताळणी करत नाही आहे.

वरील संपत्तीव्यतिरिक्त २७०० एकरची जमीन भोपाळमध्ये नवाब घराण्याची आहे. या जमिनीवर देखील खटले सुरु आहेत. या जमिनीवर अनेक पारिवारिक हक्क आहेत. या कायद्यानुसार, जर कोणी एनिमी प्रॉपर्टीवर आपल्या मुलाचा वारस असल्याचा दावा करत असेल, तर त्याला हायकोर्ट किंवा सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल करावा लागेल. सैफची वडिलोपार्जित संपत्ती मध्य प्रदेश, हरियाणा आणि दिल्ली येथून इतर अनेक राज्यांत पसरली आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !