Headlines

या कारणामुळे अनिल कपूर, श्रीदेवी यांच्या दिसताच क्षणी पाया पडायचे, स्वतःच सांगितले कारण !

एक काळ असा होता जेव्हा पडद्यावर अनिल कपूर आणि श्रीदेवी यांचे चित्रपट लागले की चित्रपटगृहाबाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड लागायचे. या दोघांची केमिस्ट्री ही प्रेक्षकांना नेहमीच आवडले. तसे पाहायला गेले तर श्रीदेवी या अनिल कपूर च्या भावाच्या पत्नी होत्या. अनिल कपूर हे कुठेही गेले तरी नेहमी श्रीदेवी यांच्या पाया पडायचे. याबाबतचा खुलासा अनिल कपूर यांनी एका रियालिटी शो दरम्यान दिला.

अनिल कपूर यांचे भाऊ बोनी कपूर यांनी २ जून १९९६ ला अभिनेत्री श्रीदेवी सोबत लग्न केले. त्यामुळे मोठ्या पडद्यावर एकमेकांचे प्रियकर-प्रेयसी असलेले अनिल कपूर आणि श्रीदेवी खऱ्या नात्यात एकमेकांचे दिर आणि भावजय झाले. अनिल यांनी सांगितले की, इमेज श्रीदेवी च्या पाया पडायचे. मग तो कुठला इव्हेंट असो किंवा पुरस्कार सोहळा….

अनिल नेहमीच एक वहिनी या नात्याने आदराने श्रीदेवी च्या पाया पडायचे मात्र श्रीदेवी त्यावेळी खूप अनकम्फर्टेबल व्हायच्या. श्रीदेवी नेहमीच त्यांना पाया पडण्यास रोखायच्या. त्या नेहमी अनिल यांना विचारायच्या की तुम्ही माझ्या पाया का पडतात? यावर अनिल यांचे उत्तर असायचे की मी तुमच्या पाया पडल्यावर तुमचे थोडेतरी टॅलेंट माझ्यात उतरेल अशी माझी इच्छा असते यासाठी मी तुमच्या पाया पडतो. अनिल कपूर नेहमीच श्रीदेवी यांची काम करण्याची पद्धत चित्रपट आणि व्यक्तिमत्वाला अॅप्रिशिएट केले आहे.

अनिल कपूर आणि श्रीदेवी यांची जोडी ही बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध सिल्वर स्क्रीन केमिस्ट्री मधील एक म्हणून ओळखली जाते. या दोघांनी अनेक हिट चित्रपट एकत्र केले. पण तुम्हाला माहित आहे का एके काळ नंतर श्रीदेवी यांनी अनिल कपूर सोबत काम करण्यास नकार दिला होता. असे म्हटले जाते की मिस्टर इंडिया मधला अनिल कपूर यांचा रोल सुरुवातीला अमिताभ बच्चन करणार होते मात्र काही कारणास्तव तो रोल अनिल कपूर यांनाच मिळाला.

जुदाई या चित्रपटानंतर श्रीदेवी यांनी अनिल कपूर सोबत काम करण्यास नकार दिला. यामागे श्रीदेवी यांचे म्हणणे होते की, एकाच अभिनेत्यासोबत सतत स्क्रीन शेअर केल्यास ती जोडी आणि त्या कलाकारांची क्रेज प्रेक्षकांच्या मनात कमी होते. याच कारणामुळे अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्या बेटा या चित्रपटामध्ये श्रीदेवी दिसल्या नाहीत. खरे तर या चित्रपटात माधुरीने साकारलेला रोल हा श्रीदेवीला लक्षात घेऊनच तयार केला होता.

अनिल कपूर यांनी सांगितले की त्यांची वहिनी इंडस्ट्रीमधील सर्वात मोठी सुपरस्टार होती. तिने तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम इंडस्ट्रीमध्ये टॉपचे पद कधीच सोडले नाही. भारतीय चित्रपटसृष्टीची नंबर वन स्टार बनली होती. अनिल कपूर आणि श्रीदेवी यांनी कर्मा, मिस्टर इंडिया, राम अवतार, सोने पे सुहागा, लम्हे, हिरा रांझा, गुरुदेव, रूप की रानी चोरों का राजा, लाडला, मिस्टर बेचारा आणि जुदाई यांसारख्या सुपर हिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले.

अनिल कपूर बद्दल बोलायचे झाल्यास त्यांचा एके वर्सेस एके ही वेबसेरीज लकरच प्रदर्शित होईल. या चित्रपटात अनिल कपूर आणि अनुराग कश्यप हे त्यांची मूळ भूमिका साकारणार आहेत. म्हणजे त्या चित्रपटात अनिल कपूर एक स्टार असतील तर अनुराग कश्यप दिग्दर्शक. अनुराग कश्यप या चित्रपटात अनिल कपूर यांच्या मुलीचे अ*प*ह*र*ण करतात यानंतर मुलीला सोडवण्यासाठी अनिल कपूर जी धावपळ करतात ती एका छुप्या कॅमेर्‍याने शूट करतात जेणेकरून ते दुनिया ला एका मोठ्या स्टार ची खरी ॲक्शन फिल्म दाखवू शकतील. अशी या चित्रपटाची वन लाईन स्टोरी आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !