कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वच ठिकाणी कडक लॉकडाऊन पाळले जात आहे. या लॉकडाऊनमध्ये पुन्हा एकदा रामानंद सागर यांची रामायण मालिका पुन्हा टीव्हीवर प्रसारित केली जात आहे. मुख्य म्हणजे इतर टीव्हीवरील कार्यक्रम किंवा मालिकांपेक्षा रामायण मालिका पाहणारा प्रेक्षक वर्ग अधिक आहे.
तरं या रामायणामधील एक महत्त्वपूर्ण पात्र होते हनुमान आणि हे हनुमानाच पात्र अभिनेते आणि कुस्तीपट्टू दारा सिंह यांनी निभावले. दारा सिंह यांना रामायण मालिकेमध्ये हनुमान हे पात्र साकारण्याची संधी मिळताच त्यांनी नॉन व्हेज खाणं सोडून दिले. दारा सिंह हे पात्र खऱ्या अर्थाने हनुमान जगत होते. या गोष्टीबद्दल दारा सिंह यांचा मुलगा विंदू दारा सिंह यांनी सांगितले.
वेबसाईटवर बोलताना विंदू दारा सिंह यांनी ही माहिती दिली. रामायणातील दारा सिंह यांनी हनुमान हे पात्र साकारल्यानंतर त्यांच्या जीवनात बदल झालेले दिसून आले. दारा सिंह हे अभिनेते व कुस्तीपट्टू तर होतेच पण सोबतच ते राजकारणात देखील सक्रिय होते. ऑगस्ट २००३ – ऑगस्ट २००९ या काळात ते भारतीय जनता पक्षाकडून भारताच्या राज्यसभेवर निवडून गेले होते.
हे वाचा – दारासिंह यांना अशा प्रकारे मिळाला हनुमानाचा रोल, मुलगा विंदू सिंह याने सांगितली कहाणी !
इ.स. १९६२-६३ या दोन वर्षांत दारासिंगांचे सॅमसन, हर्क्युलस, तूफान, आया तूफान, फिर आया तूफान, थीफ ऑफ बगदाद, आणि टारझन यांसारखे डझनभर चित्रपट प्रकाशित झाले. वयाच्या ५३ वर्षांपर्यंत सक्रिय कुस्तीगीर म्हणून देखील प्रसिद्ध होते. इ.स. १९७० च्या दशकात दारा प्रॉडक्शन या नावाखाली दारासिंगांनी चित्रपट-निर्मिती सुरू केली.
वीरेंद्रसिंग(विंदू) या आपल्या मुलाची भूमिका असलेला दारा प्रॉडक्शनचा ’करण’ हा शेवटचा चित्रपट होता. भारतातील अनेक शहरांत जाऊन पहिलवानांना मार्गदर्शन करण्यात, आणि कुस्त्यांचे फड भरवण्यात ते सक्रिय होते. रामानंद सागर यांच्या रामायण या मालिकेमधील हनुमानाच्या पात्रासाठी दारा सिंह हे सर्वात अचूक निवड ठरले.
हे वाचा – रामायण मध्ये रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल यांची संपत्ती ऐकून तुम्ही थक्क व्हाल !दारा सिंह यांनी देखील त्यांना मिळालेले पात्र खूप उत्तम पद्धतीने साकारले. दारा सिंह यांची प्रतिभा, धिप्पाडपणा, उत्तुंग व्यक्तिमत्त्व यांना लोकांची वाहवा मिळाली. दारा सिंह यांनी रामायण मालिकेव्यतिरिक्त १९७६ साली प्रदर्शित झालेल्या बजरंगी या चित्रपटातदेखील हनुमानाचे पात्र साकारले.
हे वाचा – या ६ अभिनेत्यांनी साकारली प्रभू रामाची भूमिका, पण यांची ठरली सर्वांत प्रसिद्ध !
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !