या कारणामुळे काजोलला ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटात घालावा लागला होता मिनीस्कर्ट !

6089

आदित्य चोपडा ने जेव्हा काजल आणि शाहरुख खान ला घेऊन दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे हा चित्रपट बनवला तेव्हा त्यांच्या मनात देखील आले नसेल की हा चित्रपट पुढे जाऊन एवढा हीट होईल. चित्रपट प्रदर्शित होऊन तेवीस वर्षे पूर्ण झाली पण अजून देखील हा चित्रपट पडद्यावरून उतरलेला नाही.

या चित्रपटातील गाणी चित्रपटाप्रमाणेच हिट झाली होती. यातील मेरे ख्वाबो मे जो आये या गाण्यातील एका भागात काजोलने पांढऱ्या रंगाचा मिनी स्कर्ट घातला होता. आणि तो घालून तिने पावसात डान्स सुद्धा केले होता. काजोलचे शॉर्ट-स्कर्ट घालण्यामागे सुद्धा एक कारण होते.

या गाण्यांमध्ये आदित्य चोपडा यांनी जाणून-बुजून काजोलला शॉर्ट स्कर्ट घालण्यास लावला होता. कारण याआधी जो स्कर्ट डिझाईन करण्यात आला होता तो आदित्य चोप्रा यांना पसंत पडला नाही त्यामुळे त्यांनी डिझायनर मनिष मल्होत्रा यांना तो स्कर्ट कापून टाकण्यास सांगितला. त्यामुळे आदित्य चोपडा यांच्या सांगण्यावरून मनिष मल्होत्रा यांनी तर स्कर्ट मिनीस्कर्ट केला.
तसे बघायला गेले तर त्यांना तो स्कर्ट थोडासाच कापायचा होता पण कापत कापत तो जास्तच छोटा झाला. त्यामुळे
चित्रीकरणावेळी काजोलला तो स्कर्ट मजबुरीने घालावा लागला आणि त्याच स्कर्टवर डान्स करावा लागला. या गाण्यात एक दृश्य आहे ज्यात काजोल फक्त टॉवेल वर डान्स करताना दिसते.

सुरवातीला ती तो डान्स करायला राजी नव्हती. पण आदित्य चोपडा यांनी काजोलला विश्वासात घेऊन सांगितले की तिने तो सीन करावा. मी तो पडद्यावर अगदी क्लासी पद्धतीने दाखवीन. त्यानंतरच ती या गाण्यातील टॉवेल वरील दृश्य करण्यास राजी झाली.

दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे हा चित्रपट आदित्य चोपडा यांचा दिग्दर्शनातील पदार्पणाचा पहिलाच चित्रपट होता. हा चित्रपट २० ऑक्टोबर १९९५ ला प्रदर्शित झाला. हा चित्रपट भारत, लंडन आणि स्विझर्लांड मध्ये चित्रीत केला गेला होता. त्यावेळी या चित्रपटाने दहा फिल्मफेअर अवॉर्ड जिंकले होते. तसेच सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून नॅशनल फिल्म अवॉर्ड सुद्धा मिळाला होता.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !