Headlines

अमीर खानच्या दुसऱ्या घ*ट*स्फो*ट नंतर या अभिनेत्रीला का संसार मोडी असे म्हंटले जाऊ लागले जाणून घ्या !

बॉलिवूड दूनियेत दर दिवशी काही ना काही घडत असते. अशातच बॉलीवूड मधील एक सर्वात मोठी धक्कादायक बातमी शनिवारी समोर आली ती म्हणजे परफेक्शनिस्ट कपल आमिर खान आणि किरण राव यांचा घ*ट*स्फो*ट. या दोघांनाही लग्नाच्या पंधरा वर्षानंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आमीर खान आणि किरण राव हे दोघे बॉलिवूडमधील क्युट कपल पैकी एक मानले जायचे. मात्र कुठेतरी माशी शिंकली आणि या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. या दोघांच्या वेगवेगळे होण्याच्या पाठी आमिर खानची सहकलाकार फातिमा सना शेख असल्याचे म्हटले जात आहे. आमिर आणि किरण वेगळे होत असल्याची बातमी सोशल मीडियामध्ये पसरली त्याच वेळी फातिमा साना शेख सुद्धा सोशल मीडियावर ट्रेंडला आली.

सध्या सोशल मीडियावर या घ*ट*स्फो*ट प्रकरणी वेगवेगळ्या प्रकारचे मीम्स व्हायरल होत आहे. तर काहींचे म्हणणे आहे की फातिमा मुळेच किरण आणि आमिर चे नाते तुटले. एका युजर ने लिहिले की फातिमा ही आमिरच्या आयुष्यातील नवीन महिला आहे. त्यामुळे आता अशी आशा आहे की तरी त्याच्या सोबत आयुष्यभर राहील. तर एका व्यक्तीने लिहिले या माणसाला झाले तरी काय! हा खरच सत्यमेव जयते चा होस्ट आहे का ‌? मला वाटते याने फातिमा साठी किरणला सोडले. ” टिंगू का बस कद कम है, लेकिन कारनामे बडे बडे है. तर काहींनी ट्विटर वर फातिमा सना शेख वर घर तोडल्याचा आरोप देखील केला आहे.

फातिमा सना शेख आणि आमिर खानने दंगल या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटात फातिमाने आमीरची ओनस्क्रीन मुलगी गीता फोगाट ची भूमिका साकारली होती. त्यावेळी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यशस्वी ठरला होता. दंगल नंतर आमीरने फातिमा सोबत यश राज बॅनरचा चित्रपट ठग्स ऑफ हिंदुस्तान मध्ये काम केले. या चित्रपटात फातिमा सना शेख आणि कटरीना कैफ या अभिनेत्री होत्या. कटरीना ची या चित्रपटातील महत्त्वपूर्ण भूमिका होती. परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर सपशेल आपटला. हा चित्रपट जरी फारसा चालला नव्हता तरी या चित्रपटामुळे आमीर आणि फातिमा चे नाते मात्र चर्चेत आले होते. ते दोघे एकमेकांना डेट करीत असल्याच्या चर्चा सुद्धा रंगल्या होत्या.

आमिर खान चे पहिले लग्न रीना दत्ता सोबत १९८६ मध्ये झाले. मात्र लग्नाच्या १६ वर्षांनी आमिर आणि रीना एकमेकांपासून वेगळे झाले. २००२ मध्ये त्या दोघांनी घ*ट*स्फो*ट घेतला. आमीर आणि रिनाला जुनेद आणि इरा ही दोन मुले आहेत. रिनाला घ*ट*स्फो*ट दिल्यानंतर आमिरने २००५ मध्ये किरण राव सोबत दुसरे लग्न केले. आमिर आणि किरण ची पहिली भेट लगान चित्रपट सेटवर झाली होती. किरण लगान चित्रपटाची असोसिएट डायरेक्टर म्हणून काम करत होती. किरण आणि आमीरला आजाद खान हा एक मुलगा आहे आहे. मात्र भविष्यात पुढे आजादची जबाबदारी ते दोघे मिळून सांभाळतील असे त्यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

शनिवारी दुपारी आमीर खान आणि किरण रावने एक पत्रक जारी केले. या पत्रकातून त्यांनी वेगळे होत असल्याचा निर्णय लोकांपर्यंत पोहोचवला. या पत्रकात त्यांनी लिहिले की, या पंधरा वर्षात आम्ही एकत्र जीवन भरासाठी अनुभव आनंद आणि हास्य मिळवले. आतापर्यंत आमचे नाते केवळ विश्वास सन्मान आणि प्रेमावर वाढले आहे. आता आम्ही आमच्या आयुष्याचा एक नवीन अध्याय सुरू करत आहोत.

आता आम्ही पती-पत्नी म्हणून नाही तर आजादचे आई वडील आणि परिवार म्हणून एकत्र असू. काही काळापासून आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेत होतो. आता ही गोष्ट आम्ही औपचारिक रित्या सर्वांसमोर मांडत आहोत. पण तरीही वेगळे होऊन सुद्धा आणि एक परिवार म्हणून नक्कीच एकत्र असू.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !