Headlines

बाजीगर चित्रपटात श्रीदेवी साकारणार होत्या मुख्य भूमिका पण त्यांच्या ऐवजी काजोलला का मिळाला तो रोल, जाणून घ्या !

बॉलीवूडची चांदनी म्हणजे श्रीदेवी ही भारतीय सिनेमांमधील दिग्गज कलाकारां पैकी एक आहे. श्रीदेवी यांना जाऊन आता दोन वर्षाहून अधिक काळ उलटला आहे. मात्र त्यांच्या आठवणी लोकांच्या मनात आजही ताज्या आहेत. सौंदर्य आणि हुशारी यांचे अनोखे संगम श्रीदेवी होत्या.
त्यामुळे त्यांनी सिल्वर स्क्रीन अधिक काळ गाजवली आणि त्यावर राज्य देखील केले. श्रीदेवी यांचे स्टारडम एवढे होते की त्यांना बॉलिवूडची लेडी अमिताभ बच्चन असे म्हटले जायचे. अनेक चित्रपटांच्या कहाण्या या श्रीदेवी यांना लक्षात घेऊन लिहिल्या जायच्या. शिवाय चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी सर्वाधिक पैसा घेणाऱ्या अभिनेत्री मध्ये श्रीदेवी यांचा पहिला क्रमांक लागायचा.
मात्र तुम्हाला ठाऊक आहे का याच स्टारडम मुळे श्रीदेवी यांना अब्बास-मस्तान यांचा ब्लॉकबस्टर चित्रपट बाजीगर मधून काढता पाय घ्यावा लागला होता. या चित्रपटाने शाहरूख खानला बॉलिवूडचा स्टार बनवले त्या चित्रपटासाठी श्रीदेवी या दिग्दर्शक जोडी अब्बास मस्तान यांची पहिली पसंती होत्या.
अब्बास मस्तान यांना त्यांच्या थ्रिलर ड्रामामध्ये श्रीदेवी यांना शाहरुख खानच्या अपोजिट डबल रोल साठी साइन करायचे होते. मात्र नंतर त्यांनी शाहरुख खानच्या अपोजिट श्रीदेवी यांना साइन करण्याचा प्लॅन बदलला. त्यांच्या या अचानक बदलाचे कारण ऐकून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल.

बाजीगर चित्रपट करतेवेळी अब्बास मस्तान श्रीदेवी यांना कास्ट करण्यासाठी खूप उत्सुक होते मात्र श्रीदेवी यांचे स्टारडम चित्रपटाचा हिरो शाहरुख खान वर भारी पडू शकतो ही भीती देखील त्यांना होती. हे चित्रपटासाठी नुकसानदायक सुद्धा ठरू शकत होते. चित्रपटाची संपूर्ण कथा निगेटिव्ह भूमिका करणाऱ्या शाहरुख खानच्या भोवती फिरणारी होती.

याशिवाय त्याच्या पात्रात इमोशनल टच सुद्धा होता. त्यामुळे या चित्रपटात शाहरूख खानचे पात्र हे जास्त प्रभावी पणे दाखवणे आवश्यक होते. त्याचप्रमाणे चित्रपटाच्या शेवटी जेव्हा विकी मल्होत्राचा मृत्यू होणार होता त्यावेळी ऑडियन्स या सीन सोबत भावनिक दृष्ट्या गुंतणे महत्त्वाचे होते.

याच कारणामुळे अब्बास-मस्तान यांनी श्रीदेवी यांना या चित्रपटासाठी साइन करण्याची कल्पना मागे घेतली. आणि श्रीदेवी यांच्या जागी शिल्पा शेट्टी आणि काजोलला साइन केले. शिल्पा शेट्टीने तिच्या एका मुलाखतीत या गोष्टीचा खुलासा केला होता कशाप्रकारे श्रीदेवी बाजीगर या चित्रपटांमध्ये डबल रोल करणार होत्या मात्र त्यांच्याकडून हा चित्रपट जाऊन शिल्पा शेट्टीच्या नशिबामुळे तिला या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.

या चित्रपटामुळे शिल्पा शेट्टी चे नशीब चमकले आणि ती रातोरात स्टार बनली. अब्बास मस्तान यांचा ब्लॉकबस्टर चित्रपट बाजीगर हा १९९१ मध्ये प्रदर्शित झालेला हॉलीवूड चित्रपट अ किस बिफोर डाईंग या चित्रपटावरून बनवण्यात आला होता. बाजीगर या चित्रपटाच्या यशामुळे शाहरुख खान रातोरात स्टार बनला.

बॉलिवूडच्या या हँडसम विलनने लाखो प्रेक्षकांची मने जिंकली. मात्र नंतर शाहरुखने निगेटिव्ह भूमिकांच्या ऐवजी रोमांटिक चित्रपटांमध्ये नशीब आजमावणे सुरू केले आणि आणि त्यानंतर तो बॉलीवूडचा बादशहा म्हणून ओळखला जाऊ लागला.

शाहरुख खान ला सुद्धा या गोष्टीचे वाईट नक्कीच वाटले की श्रीदेवी यांच्यासारख्या फीमेल सुपरस्टारला या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली नाही. श्रीदेवीच्या आर्मी या चित्रपटात शाहरुख खान ने पाहुण्या कलाकाराची भूमिका केली होती मात्र श्रीदेवी सोबत हीरो म्हणून काम करण्याचे स्वप्न अधुरेच राहिले.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !